Tuesday, December 31, 2019

सैन्य भरतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; जिल्ह्यात 4 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत भरती कार्यालया कडून सर्व तयारी पुर्ण

सैन्य भरतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; जिल्ह्यात 4 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत भरती कार्यालया कडून सर्व तयारी पुर्ण  
संपादक संपर्क मो.9823547752.

 परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 

जिल्ह्यात 4 ते 13 जानेवारी 2020 या कालावधीत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने भारतीय सैन्य दलाकडून सैन्य भरतीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे. या सैन्य भरतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त उमेदवारांनाच मैदानावर प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे प्रवेशपत्रावरील नोंदीनूसार उपस्थित रहावे.  सैन्य भरती कार्यालयाकडून व जिल्हा प्रशासनाकडून भरती विषयक सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. अशी माहिती सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल तरुण जमवाल यांनी दिली.
 सैन्य भरतीनिमित्त झालेल्या पुर्व तयारी बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात  करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सुनिल पोटेकर यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. 
 पुढे बोलतांना श्री.जमवाल म्हणाले, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांच्या संकल्पनेतून परभणी येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून परभणी जिल्ह्यातील उमेदवारांची नोंदणीत 20 टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 4 हजार 509 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर एकुण नऊ जिल्ह्यातील जवळपास 65 हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. सैन्य भरती प्रक्रिया संपुर्णपणे संगणकीकृत व पारदर्शक असल्याने दलालाकडून दाखवण्यात येणाऱ्या आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये. जास्तीत जास्त सुदृढ, चपळ आणि चांगले प्रकृतीमान असलेलेच उमेदवार सैन्य भरतीत निवडले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस एस.टी. महामंडळ, रेल्वे, विद्यापीठ, अग्निशमन यंत्रणा, महापालिका, आरोग्य, पोलिस, सार्वजनिक बांधकाम आदि विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment