देवडी येथे फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख हिचा गौरव
वडवणी / सोनपेठ (दर्शन) :-
देवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने नुकताच पायलट दामिनी दिलिपराव देशमुख हिचा यथोचित गौरव करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. वडवणी तालुक्यातील देवडी या गावचे मूळ रहिवासी असणारे दिलीपराव माणिकराव देशमुख सह धर्मादाय आयुक्त पुणे यांची मुलगी कु.दामिनी दिलिपराव देशमुख हिने नुकताच फ्लाईंग ऑफिसर प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्यामुळे देवडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने नुकताच गावचे ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच माणिकराव देशमुख,जालिंदर झाटे, परमेश्वर झाटे, गवरचंद आगे, तुळशीराम राऊत, बाबासाहेब झाटे, संपादक अनिल वाघमारे, पत्रकार सुधाकर पोटभरे, यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कौतुक व कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळी सह धर्मादाय आयुक्त दिलिपराव देशमुख, फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख,
वैद्यकीय अधिकारी डॉ.देवयानी देशमुख, संपादक अनिल वाघमारे यांचीही भाषणे झाली.
येथील जिल्हा परिषद शाळेसाठी सह धर्मादाय आयुक्त दिलीपराव देशमुख यांच्या माध्यमातून शाळा ई लर्निंग करण्यासाठी एक लाख रुपयाचा निधी मिळाला होता यामध्ये चार स्मार्ट टीव्ही ३३ इंच, इन्व्हर्टर आदी साहित्य मिळाले होते.त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक आंबुरे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर झाटे यांनी यथोचित सन्मान केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. संदीप देशपांडे ,आभार श्रीमती. सुरेखा शिंदे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या शाळेचा स्टाफ अंबुरे सर (मुअ), वाघमारे , खाटावकर, संगा सर, सुरवसे सह आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment