Monday, December 30, 2019

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या सहलीचे डिसेंबर ला प्रस्थान तर पुढिल वर्षी जानेवारीत आगमन होनार

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या सहलीचे डिसेंबर ला प्रस्थान तर पुढिल वर्षी जानेवारीत आगमन होनार
आज पवनचक्की पाहुन जेवन करून वाबळेवाडीची काचेची शाळा पाहीली
सोनपेठ (प्रतिनिधी) :-

जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेच्या चार दिवसीय प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी सहलीचे दिनांक 30 डिसेंबर 2019 सोमवार रोजी पहाटे 5 वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एम एच 20 बी एल 4074 व एम एच 20 बी एल 39 60 तसेच क्लुजर रेवन मामा बडे यांच्या वाहनातून 46 मुली 41 मुलं, आचारी ताई, मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड सर, शिक्षक राठोड सर, राऊत सर तर शिक्षिका जोशी मॅडम, बारगजे मॅडम, डोंगरे मॅडम, माळी मॅडम, म्हात्रे मॅडम व प्रकाश तिरमले आदींना निरोप सर्व पालकांनी दिला याप्रसंगी आरोग्यसेवा साठी दोन किट शालेय व्यवस्थापन समिती केंद्रीय कन्या शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अध्यक्ष  परमेश्वर पैंजणे यांच्यासह सर्व सदस्य, सदस्यांनी मिळून यादोन्ही कीट मध्ये ओकारी न होण्याच्या, सर्दी, ताप, संडास, पोटदुखी, खोकला, बँन्डेडपट्टी, आयोडिन असे साहित्य गोळ्या औषधी दिलेली आहे. सदरील दोन्ही किट मुख्याध्यापक प्रदीप गायकवाड सर व राठोड सर यांना ज्येष्ठ पालक वसंतराव लाखे पाटील व मारोतराव यादव यांच्या शुभहस्ते सुपूर्त करण्यात आले या प्रसंगी शाळेचा पदभार पांचाळ सर यांना सुपूर्त करून सर्वांना शुभेच्छा ही व्यक्त करण्यात आल्या ही सहल रांजणगाव, वाबळेवाडी, भीमा कोरेगाव, तुळापूर व नारायणपूर पहिला मुक्काम दिनांक 30 डिसेंबर 2019, खंडाळा, महाबळेश्वर, प्रतापगड, महाड व रायगड दुसरा मुक्काम दिनांक 31 डिसेंबर 2019, नवीन वर्ष दिनांक 1 जानेवारी 2020 रायगड ते हरिहरेश्वर तिसरा मुक्काम, हरिहरेश्वर दिवेआगार, मुरुड, जंजिरा, मुळशी व देहू मुक्काम दिनांक 2 जानेवारी 2020, पुरंदर, जेजुरी, राळेगणसिद्धी, नगर-बीड येथुन सोनपेठला परतीचा प्रवास पुढील वर्षी दिनांक 3 जानेवारी 2020 रोजी होणार आहे यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, सदस्या पालक महिला, पुरुष व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सहलीस माजी जि.प.अध्यक्ष राजेशदादा विटेकर, नुतण सभापती पं.स.सौ.मिराताई जाधव, गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण सर, केंद्रप्रमुख गनपत कोटलवार सर, मुख्याध्यापक किशन रत्नपारखे सर, शा.व्य.स.अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी व परमेश्वर पैंजणे, उपाध्यक्षा, सर्व सदस्य, सदस्या व पालकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment