सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालय संस्थापक अध्यक्ष कै.राजाभाऊ कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील वर्षापासून राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहेत. या वर्षीही स्पर्धेसाठी विषय "बदलती राजकीय समीकरणे व समाजहित" हा ठेवण्यात आला आहे.या स्पर्धेत पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयातील कुठलाही स्पर्धेक सहभाग नोंदवू शकतो स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी दि. 7 जानेवारी 2020 मंगळवार रोजी महाविद्यालयात स्पर्धा संपन्न होतील. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 5000/- (पाच हजार रुपये) द्वितीय पारितोषिक 4000/- (चार हजार रूपये) व उत्तेजनार्थ पारितोषिक 1000/- (एक हजार रुपये) अशी तीन रोख बक्षिसे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र समारोप सत्रात मान्यवरांच्या हस्ते दिली जातील तरी या स्पर्धेत महाराष्ट्रातील महाविद्यालयातील जास्तीत जास्त विध्यार्थी व विध्यार्थीनी सहभागी व्हावे असे आवाहन हनुमंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्राचार्य डॉ.वसंत सातपुते व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सखाराम कदम यांनी केले आहे अधिक माहिती साठी मोबाईल क्रमांक 9423779000 / 7378936949 / 9657700237 वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment