सोनपेठ येथे खंडोबा नवराञोत्सवाची उत्साहात सांगता
सोनपेठ (दर्शन) :- शहरातील हणुमान चौक येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी सटी निमित्त सोमवारी खंडेरायाच्या नवराञोत्सव घटस्थापनेची उत्साहात सांगता करण्यात आली.शहरातील असंख्य भक्तांचे कुलदैवत असलेले मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा मंदिर येथे सटी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, या निमित्त मंदिराची सजावट करण्यात आली होती, खंडोबा मुर्तीला पगडी वस्त्राने सजविण्यात आले होते, या निमित्त पहाटे महापुजा, देवाचा विवाह व तळी उचलण्याचा कार्यक्रम संपन्न झाला, सायंकाळी डफाच्या थापावर वारू नाचत भंडाऱ्याची उधळण करत "येळकोट येळकोट जय मल्हार" च्या जयघोषात ध्वज काठी ची मिरवणुक काढण्यात आली, चंपाषष्ठी निमित्त मंदिराची सजावट करण्यात आली होती, कार्यक्रम यशस्वीतेसाठी विष्णुपंत वाघे, शिवमल्हार वाघे, संजय वाघे, नगरसेवक अमृत स्वामी, सुनील बर्वे, दिपक वाघे, बालाजी वाघे, नितीन वाघे, आकाश वाघे, विकास वाघे, रमेशराव रेडे, नवनाथ शिंदे, राजू वाघमारे, प्रथमेश वाघे, भैय्या रेडे, रामेश्वर रेडे, दुर्गादास सरवदे, सोमनाथ रेडे, दिलीप सरवदे आदींनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment