Friday, October 2, 2020

स्वाराती रक्तपेढितील डॉ.दीनेश सोनवणे यांनी केला "प्लास्मा दान" ठेवला जनतेसमोर आदर्श

स्वाराती रक्तपेढितील डॉ.दीनेश सोनवणे यांनी केला "प्लास्मा दान" ठेवला जनतेसमोर आदर्श 



अंबाजोगाई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

आशिया खंडातील पहिले ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय म्हणून नावलौकिक असलेले स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांसाठी प्लास्मा थेरपी उपचार पद्धतीचा अवलंब करण्यासाठी महाविद्यालयातील डॉ.दिनेश सोनवणे अंतरवासित डॉक्टर म्हणून कार्य बजावत असताना कोरोना बाधित झाले तसेच कोरोनावर यशस्वी मात करून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्लास्मा दान करण्याचे ठरवले.रक्तपेढीचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी प्लास्मा  दान केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी डॉ.दिनेश सोनवणे यांचे कौतुक केले.यावेळी बोलताना डॉक्टरांनी केलेले हे प्लास्मा दान सर्वसामान्य जनतेसाठी एक आदर्श असल्याचे सांगितले.कोरोनातून  बरे होणारे रुग्ण हे प्लास्मा दान करून दोन कोरोना बाधित रुग्णांचे प्राण वाचवू शकतात तसेच जनतेमधील प्लास्मादाना बाबत असेलेली भीतीचे वातावरण नक्कीच यानंतर कमी  होईल अशी आशा व्यक्त केली.ज्या पद्धतीने आपण रक्तदान करतो त्याही पेक्षा प्लास्मा दानाची पद्धत सोपी आहे.असे मत डॉ.दिनेश सोनवणे यांनी व्यक्त केले.कोरोना वर मात केलेल्या रुग्णांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतःहून प्लास्मा दान करण्यासाठी पुढे यावे त्यामुळे अतिगंभीर व मध्यम प्रकारची लक्षणे असणारी कोरोना बाधित रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत होईल.असे आवाहन रक्तपेढीचे प्रभारी अधिकारी डॉ.सुनिल स्वामी यांनी व्यक्त केले.प्लास्मा दान यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी रक्तपेढी विभागातील डॉ.विनय नाळपे, डॉ.आरती बर्गे, डॉ.नारायण पौळ, सोजर गालफाडे, रमेश तोगरे, महानंदा सरवदे, शशिकांत पारखे, अंकुश खरटमोल व इतर सर्व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.

प्लास्मा दात्यांसाठी मार्गदर्शक तत्वे / नियमावली 
1) प्लास्मा दाता हा कोव्हीड पॉझिटिव्ह असलेला असणे आवश्यक आहे व तो बरा झाल्यानंतर 28 दिवसानंतर प्लास्मा दानकरू शकतो तसेच चार महिन्यापर्यंत तो प्लास्मा दान करू शकतो.
2)त्याचे वय 18 ते 60 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
3)त्याचे वजन 50 किलो पेक्षा अधिक असावे.
4)त्याचे हिमोग्लोबिनचे प्रमाण 12.5 gm % पर्यंत असावे.
 5)प्लास्मा दात्याला कोणतेही आजार नसावेत.
6)प्लास्मा दाता  हा सर्वसाधारण लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी असावा.
 7)त्याच्या शरीरात मारक द्रव (antibodies) असाव्यात.
8)प्लास्मा दात्याची प्लास्मा दान करण्याआधी रक्त तपासणी केली जाते व सदरील रिपोर्ट पाहूनच प्लास्मा दान केले जाते.जमा केलेला प्लास्मा हा 40 ते 80 डिग्रीला एक वर्षा पर्यंत साठवला जातो.
 9)प्लास्मा दान प्रक्रियेला साधारण पणे 40 ते 50 मिनिटे लागतात.प्लास्मा दान करणे ही संपूर्णपणे सुरक्षित अशी प्रक्रिया आहे.

No comments:

Post a Comment