पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे शुक्रवारी (दि.23) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
दि.23 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता औरंगाबाद येथून निघून मौजे हादगाव ता.सेलू येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. सकाळी 11 वाजता ढेंगळी पिंपळगाव येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची ते पाहणी करतील. सकाळी 11.45 वाजता मौजे कोल्हा ता.मानवत येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची पाहणी करणार असून दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह सावली येथे आगमन होईल. दुपारी 1 वाजता अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीबाबत, कोविड-19 व जिल्ह्यातील इतर महत्वाच्या विषयाबाबत सर्व शासकीय यंत्रणेसमवेत श्री मलिक हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 2.30 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने पाथरीकडे प्रयाण करतील. दुपारी 3.30 वाजता मौजे रामपुरी ता.पाथरी येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची ते पाहणी करतील व सायंकाळी 4 वाजता शासकीय वाहनाने माजलगाव मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

No comments:
Post a Comment