सोनपेठ (दर्शन) :-
माझे कुटुंब,माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेचा चा दुसरा टप्पा परभणी जिल्ह्यात राबविण्यात येत असून सोनपेठ येथे परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.श्रीमती निर्मलाताई विटेकर यांच्या निवासस्थानी आरोग्य पथकाने भेट देऊन आरोग्य तपासणी केली.यावेळी ग्रामिण रुग्नालय अधिक्षक डाँ.सिध्देश्वर हालगे,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.सुभाष पवार,डाँ.सचिन कसपटे
कोव्हीड केअर सेंटर प्रमुख तथा मेडिकल आॕफिसर, आरोग्य सेविका चिभडे व हनवते आदिंची उपस्थीती होती.
याप्रसंगी डाँ.सुभाष पवार सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना सोनपेठ तालुक्यातील 18 हजार 728 कुटुंबातील 93 हजार 642 नागरिकांची आशा आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत तपासणी करण्यात येणार आहे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचे ऑक्सिजन लेव्हल, तापमान यंत्राद्वारे नोंदविले जाणार आहे यासाठी तालुक्यात 82 पथकाचे कार्य चालू आहे.यामध्ये सोनपेठ शहरातील 4202 कुंटुंबासाठी 6 पथके कार्य करत असुन प्रतेक पथकात तिन कर्मचारी काम करत आहेत.तमाम नागरीकांनी कोरोना हा आजार सहज नघेता आपली, परीवाराची तसेच परीसरातील नागरीकांचे आरोग्य ठणठनीत राहण्यासाठी प्रतेकांनी महाराष्ट्र शासनाच्या त्रिसुत्री चा जसे तोंडाला नाक व तोंड झाकेल असा मास्क, दर दोन तासाला सँनिटायझर चा तत्परतेने सतत वापर व सामायीक अंतर प्रतेकाने पालन कलेच पाहीजे.


No comments:
Post a Comment