Saturday, October 10, 2020

एका वर्षात 71 हजार 68 नागरिकांची खाती पोस्टाने उघडली

एका वर्षात  71 हजार 68 नागरिकांची खाती पोस्टाने उघडली 
 

परभणी / सोनपेठ (दर्शन):- 

परभणी डाक विभागाने आयपीपीबी बँकेच्या कार्यात मोलाचा सहभाग नोंदवून मागील एका वर्षात 71 हजार 68 नागरिकांचे आयपीपीबी खाते उघडले आहेत. तसेच  आधार एनाबल पेमेंट सिस्टीमद्वारे 18 हजार 395 लाभार्थ्यांना एकूण 3 कोटी 74 लाख 86 हजार 605 रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आयपीपीबीच्या www.ippbonline.com या संकेतस्थळास भेट द्यावी, असे डाकघर अधीक्षक, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment