15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू, मात्र केंद्राने घातली मोठी अट; वाचा काय आहेत नवे नियम
शाळा सुरू झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये, त्याचबरोबर मुलांचे मन:स्वास्थ्य योग्य राहील याचीही काळजी घेण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत.
नवी दिल्ली / मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) : -
देशात सुरू असलेल्या Unlockच्या प्रक्रियेनुसार देशात शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली होती. आता 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपले वेगळे नियम करू शकतात असं सांगत नव्या नियमांमध्ये अनेक अटीही टाकण्यात आल्या आहेत.
शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी तो निर्णय हा सक्तीचा नाही. राज्ये आपल्या राज्यात असलेल्या परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर पालकांची लेखी परवानगी घेऊनच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल. मुलांना शाळेत येणं हे बंधनकारक नाही. मुलं घरी राहून Online माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे.
शाळा सुरू झाल्यानंतर 2 ते 3 आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये, त्याचबरोबर मुलांचे मन:स्वास्थ्य योग्य राहील याचीही काळजी घेण्याचे निर्देश यात देण्यात आले आहेत.

No comments:
Post a Comment