Saturday, October 17, 2020

हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुटुंबातील यशस्वी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार

हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुटुंबातील
यशस्वी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार


सोनपेठ (दर्शन) :-

हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुटुंबातील कै. र.व.महाविद्यालयाच्या ईश्वरी वसंत सातपुते, निधी अंगद गंगणे यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल व नुकत्याच झालेल्या  नीट परीक्षेच्या निकालात ऋषिकेश तुकाराम तळेकर व रोहन रमेश काळे हे गुणवत्तेत चमकल्यामुळे त्यांचा सत्कार अध्यक्ष परमेश्वरराव कदम,उपाध्यक्षा ज्योती कदम,सदस्या निर्मलाताई कदम,पुजा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य वसंत सातपुते,प्रा.सुनिता टेंगसे (सातपुते),प्रा.मुक्ता सोमवंशी (गंगणे),माजी सैनिक अंगदजी गंगणे,रामेश्वर कदम,तुकाराम तळेकर,रमेश काळे आदिंची प्रमुख उपस्थीती होती.याप्रसंगी परमेश्वर कदम यांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना आमचे सर्व ह.शि.प्र.मंडळात शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने गुणवंत व यशस्वी व्हावे अशी आपेक्षा व्यक्त केली तसेच या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.या यशस्वी विध्यार्थ्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment