Wednesday, September 30, 2020

प्रा.गोविंद लहाने यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर

प्रा.गोविंद लहाने यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर 


सोनपेठ (दर्शन)

सोनपेठ येथील दै.सोमेश्वर साथीचे तालुका प्रतिनिधी व श्री.महालींगेश्र्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.गोविंद त्रिंबकराव लहाने यांची, एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे.
 
               प्रा.गोविंद लहाने हे सोनपेठ येथील श्री महालिंगेश्र्वर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून ते आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही नेहमी सहभागी असतात. ते विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवित असतात तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात नेहमी शैक्षणिक व सामाजिक जनजागृती करत असतात. प्रा. गोविंद लहाने हे शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक नावलौकिक व्यक्तिमत्व असून विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत तर सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असतात आजपर्यंत त्यांनी सोनपेठ व परिसरातील अनेक गावात विविध उपक्रम राबविले आहेत ( स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, पर्यावरण जनजागृती, कलामहोत्सव,गुणगौरव कार्यक्रम ) तर ते एक प्रसिद्ध कवी आहेत. काव्य लेखन व एकांकिका लेखनही करतात. त्यांच्या अनेक कविता प्रातिनिधिक कविता संग्रहातून प्रकाशित झाल्या आहेत तर त्यांचा "दुहिता" हा चारोळी कविता संग्रह प्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे
यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. तर त्यांना आतापर्यंत महात्मा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, कविरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब सोनपेठ आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत तर त्यांनी २०१८-१९ ला भूतान पर्यावरण अभ्यास दौरा यशस्वी केला.त्यांच्या या कार्यावरून एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र, यांनी राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड केली असून हा पुरस्कार २ ऑक्टोबर २०२० शुक्रवार रोजी सांस्कृतिक सभागृह ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथील कार्यक्रमात मा.खासदार डॉ.फौजिया खान व सिने.अभिनेता मा.अनिल मोरे यांच्या हस्ते आणि माजी खा. गणेशराव दुधगावकर यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे.राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्रा.गोविंद लहाने यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment