Saturday, October 10, 2020

परभणीच्या अंकिता मानेला "जिल्हाधिकारी" होन्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार - मा.आ.डाँ.राहुल पाटिल

परभणीच्या अंकिता मानेला "जिल्हाधिकारी" होन्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार -  मा.आ.डाँ.राहुल पाटिल



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

पोटाची खळगी भरण्यासाठी कारेगाव रोडवर छोटसं बांगड्यांच दुकान चालवून त्या व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांतून उदरनिर्वाह चालवणाऱ्या माने कुटुंबातील अंकिता हिने स्वतःची वेगळी चमक सिद्ध केली आहे. कोटा, पुणे, औरंगाबाद किंवा अन्य कुठल्याही मोठ्या शहरात क्लास न लावता घरीच अभ्यास करून आपल्या जिद्दीने थेट आयआयटीत अभियांत्रिकी पदवी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण केलं. परभणीच्या अंकिता मानेने JEE ऍडव्हान्स मध्ये देशात 793 वा रँक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल मा.आ.डाँ.राहुल पाटिल यांनी दि.10 आँक्टोबर 2020 शनिवार रोजी तिच्या घरी जाऊन पालक व शिक्षकांसह तिचा सत्कार करून अभिनंदन केले.परभणीतील अर्जुनराव माने यांचे कारेगाव रस्त्यावर बांगड्यांचे दुकान, त्यांची कन्या अंकिता हिने दहावीत 94 % मार्क्स मिळवले, IIT परीक्षेची तिची इच्छा होती मात्र माने कुटुंबाची जेमतेम अशी आर्थिक परिस्थिती असल्यामुळे अत्यंत हुशार असताना सुध्दा इतरांप्रमाणे ते अंकिताला कोटा किंवा अन्य महानगरांकडे शिकावयास पाठवू शकले नाहीत. परंतु अंकिताने हार न मानता अगदी जिद्दीने आणि योग्य अशा मार्गदर्शनाच्या बळावर आयआयटी इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण केल.आयआयटीमध्ये इंजिअरिंग पूर्ण केल्यानंतर युपीएससी परीक्षा देऊन "जिल्हाधिकारी" होण्याचे आपले स्वप्न आहे असे मा.आ.डाँ.राहुल पाटिल यांना अंकिताने सांगितले. तिच्या धैय्याचा मला अभिमान वाटतो आहे, तिने हे स्वप्न पूर्ण करावे आणि परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवावा.या वाटचालीसाठी मा.आ.डाँ.राहुल पाटिल यांनी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे किंबहुना एक लोकप्रतिनिधी म्हणून हे माझ्यासाठी भाग्य राहील असा शब्द याप्रसंगी दिला.


सा.सोनपेठ दर्शन बातम्या व जाहीरातीसाठि 
संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.

No comments:

Post a Comment