Wednesday, October 14, 2020

संविधान बचाव समितीकडून हाथरस प्रकरणी 'इन्साफ दो' आंदोलन

संविधान बचाव समितीकडून हाथरस प्रकरणी 'इन्साफ दो' आंदोलन



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

परभणी येथिल संविधान बचाव समितीच्या वतीने सोमवार दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी शहरातील अपना कॉर्नर येथे हाथरस प्रकरणी 'इन्साफ दो' आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात खासदार डॉ.फौजिया खान, लोकनेते विजय वाकोडे, कॉम्रेड राजन क्षीरसागर, शिवाजीराव कदम,नितीन सावंत,डॉ.सुनील जाधव,मौलाना रफीयोद्दीन आश्रफी,मौलाना जहांगीर नदवी,मोईन अन्सारी,जाफर खान,सरदार चंदा सिंग,शेख इब्राहिम यांच्यासह संविधान बचाव समिती परभणीचे सदस्य मोठया संख्येने उपस्थीत होते.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मनिषा वाल्मीकी या युवतीवर गँगरेप करणा-या नराधमांना तात्काळ फाशी द्यावी व योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावावी या मागण्यांसाठी हे आंदोलन संविधान बचाव समितीचे अध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. देशभरात संविधानिक मुल्याच्या होणा-या हननांबदल चिंता व्यक्त करून न्यायासाठी लढणा-यांना बदनाम करण्याचे कुटील कारस्थान मोदी - योगी सरकार करीत असल्याचा आरोप यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून केला.कार्यकर्त्यांनी निषेध शब्द लिहिलेले काळे जाकीट परिधान केले होते.

No comments:

Post a Comment