परभणी जिल्हा पोलिस दलातील दहा कर्मचारी होणार फौजदार
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हा पोलिस दलातील दहा पोलिस कर्मचार्यांना सोमवारी (दि.20) फौजदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
2013 साली राज्यातील पोलिस अंमलदारांची विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी हजारो अंमलदार परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, मागील सात वर्षांपासून ते आपल्या खांद्यावर दोन स्टार कधी मिळतात याकडे डोळे लाऊन होते. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस महासंचालक कार्यालयाने पदोन्नती देण्यासाठी संबंधितांची माहिती मागवली. सतत सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील एक हजार 61 पोलिस कर्मचारी फौजदार होणार आहेत. त्यात परभणीतील दहा जणांचा समावेश आहे. यात चंद्रचूड हत्तेकर, माधव (अण्णा) लोकूलवार, साहेब चौरे, गणेश कदम, प्रभाकर अंभोरे, राजू ननवरे, भगवान जाधव, मारोती फड, प्रकाश पंडीत, सय्यद अहेमद यांचा समावेश आहे.

No comments:
Post a Comment