नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी मारला शहरातून फेरफटका...
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी शनिवारी (दि.17) सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत मध्यवस्तीसह चोहू बाजुंच्या वसाहतीमधून फेरफटका मारला.
पोलिस अधीक्षक श्री. मीना हे मागील शनिवारी (दि.10) रूजू झाले आहेत. तेव्हापासून ते शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस अधिकार्यांशी हितगुज करीत माहिती घेऊ लागले आहेत. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक श्री.मीना यांनी शनिवारी शहरातील विविध भागांचा फेरफटका केला. विशेषतः तिन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठा तसेच गर्दीची ठिकाणे किंवा संवेदनशील भागांमधून फेर फटका मारला. अधीक्षकांच्या पाहणी दौर्याच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पोलिस ठाण्यासह वाहतुक शाखेचे अधिकारी - कर्मचारी कमालीचे सतर्क होते. नवरात्र आणि अधीक्षकांचा दौरा ओळखून संबंधित पोलिस ठाण्यांनी संवेदनशील भागांमधून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैणात केला होता. जिंतूर रोड, वसमतरोडवर तसेच मध्यवस्तीतील चौकांमधून कर्मचारी सकाळपासून ठाण मांडून होते.

No comments:
Post a Comment