Monday, October 5, 2020

सोनपेठचे जावई पोलिस जसविंदर सिंघ जसबीर सिंघ चिमा "कोन बनेगा करोडपती" मध्ये झाले लखपती

सोनपेठचे जावई पोलिस जसविंदर सिंघ जसबीर सिंघ चिमा "कोन बनेगा करोडपती" मध्ये झाले लखपती 

सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ येथील रुपिंदर सिंघ शाहू यांचे कनिष्ठ जावई तसेच नांदेड येथील जसबीर सिंघ सुरज सिंघ चिमा व सौ.बसंत कौर जसबीर सिंघ चिमा यांचे सुपुत्र "जसविंदर सिंघ जसबीर सिंघ चिमा" नांदेड येथिल इतवारा पोलीस स्टेशनचे पोलीस नुकत्याच संपन्न झालेल्या सोनी टेलिव्हिजन च्या "कोण बनेगा करोडपती" या कार्यक्रमात दिनांक 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर सलग दोन भागात महानायक अभिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन - साडे बारा लाख रुपये (12,50,000/-) यांनी जिंकून लखपती झाले असुन. त्यांच्या या यशाबद्दल सासरे रुपिंदर सिंघ शाहू, सासु सौ.सुरेंद्र कौर रुपिंदर सिंघ शाहू, मेहुना सतविंदर सिंघ शाहु, अॕड. सरबजीत सिंघ शाहु, मेहुनी सौ.अमरजीत कौर धर्मेन्द्र सिंघ शिलेदार (विष्णुपुरी,नांदेड), पत्नी अॕड.हरज्योत कौर जसविंदर सिंघ चिमा (नांदेड) मुलगा तेजविर सिंघ जसविंदर सिंघ चिमा आदींनी अभिनंदन केले आहे.तसेच जसविंदर सिंह चिमा यांनी बोलताना त्यांच्या तेजवीर सिंघ चिमा या मुलास ही शिष्यवृत्ती शिक्षणासाठी (1,00,000) एक लाख रुपये वेगळे याच कारेक्रमात मिळाले आहेत.याच मुलासाठी त्याच्या शिक्षणासाठी व त्याच्या भवितव्यासाठी नियोजन करण्याचा विचार साप्ताहिक सोनपेठ दर्शनशी बोलताना त्यांनी व्यक्त केला.तसेच या यशाबद्दल नांदेड इतवारा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नरवाडे साहेब,  सहाय्यक पोलिस निरीक्षक पठाण साहेब, सहाय्यक पोलिस निरीक्षक नागरे साहेब आदीसह सर्व पोलिस कर्मचारी बांधवांनी तसेच साप्ताहिक सोनपेठ दर्शन परिवाराच्यावतीने ही अभिनंदन व्यक्त करण्यात आले व नांदेड पंचक्रोशीतील सर्व स्तरातील नागरिकांनी जसविंदर सिंघ चिमा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून,अनेक गन माननीय व्यक्ती तसेच प्रशासकीय अधिकारी व्यक्तींच्या हस्ते आदर सत्कार होताना दिसत आहे.


सोनपेठ पंचक्रोशितील बातमी व जाहीरातीसाठि संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment