सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथिल संभाजीनगर चे विठ्ठल यमगर यांचे कनिष्ठ चिरंजीव करन यमगर घरच्या पाण्याच्या मोटर ला पिन लावताना तिव्र विजेच्या धक्क्याने दि.8 आँक्टोबर 20 गुरुवार रोजी सकाळी दुःखद निधन झाले.त्यांचावरती अंत्यसंस्कार सार्वजनिक स्मशानभुमीत दुपारी 2 वाजता करण्यात आले.यावेळी पंचक्रोशितील सर्व स्तरातील नागरीक, नातेवाईक उपस्थित होते.याप्रसंगी शहिद मुंजाभाऊ तेलभरे चौक ते टिपु सुलतान चौक स्थित रामनाथ काबरा मार्केट ते आनंद काँप्लेक्स च्या सर्व लहान मोठ्या व्यापारी बांधवा सह पान पट्टी असोशिऐशन चे सर्व पान पट्टी चालकांनी आपली व्यवसाय बंद ठेऊन भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.पंचक्रोशितील नागरीकांनी हळहळ व्यक्त केली.करन यमगर याचे वय वर्ष केवळ 18 असुन एवढ्या लहान वयात नियतीने क्रुर घाला घातला सोनपेठ च्या प्रतेक चौका - चौकात करन यमगर याच्या प्रतिमेचे बँनर लाऊन मित्र मंडळीने ही भावपुर्ण श्रद्धांजली अर्पन केली.याच्या पश्च्यात आई, वडिल विठ्ठल यमगर, बहीन व भाऊ पवन यमगर असा परीवार आहे.या सर्वांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो अशी प्रार्थना अखिल भारतीय वारकरी मंडळ तसेच सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने करण्यात आली.

No comments:
Post a Comment