पदवीधर मतदार संघाची प्रारुप यादी प्रसिद्ध ; हरकती व सूचना 13 ऑक्टोबरपर्यंत सादर करा
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी दि. 6 ऑक्टोबर 2020 रोजी मतदान केंद्राची एकत्रित प्रारुप यादी व सूचना पत्र ( मराठी व इंग्रजी ) प्रसिध्द करण्यात येणार आहे. पदवीधर मतदारांनी मतदान केंद्राच्या प्रारुप यादी संबंधातील हरकती व सूचना 13 ऑक्टोबर, 2020 पर्यंत सादर कराव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी केले आहे.
05 - औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक- 2020 साठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्राची प्रारुप यादी जिल्हाधिकारी कार्यालय , सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये व तहसील कार्यालये तसेच जिल्हा सूचना विज्ञान केंद्र परभणी आणि जिल्ह्याच्या parbhani.gov.in या संकेतस्थळावर दि .6 ऑक्टोबर 2020 रोजी मतदान केंद्रांची एकत्रित प्रारुप यादी व सूचना पत्र ( मराठी व इंग्रजी ) प्रसिध्द करण्यात येणार आहे . मतदान केंद्राच्या प्रारुप यादी संबंधाने हरकती व सूचना असल्यास यादी प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून सात दिवसांपर्यंत म्हणजेच दि. 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, परभणी यांच्याकडे सादर करावेत.
सा.सोनपेठ दर्शन पंचक्रोशितील अग्रगंन्य साप्ताहिक बातमी व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.


No comments:
Post a Comment