Saturday, October 10, 2020

1)बया ..२) छावा ..कवी - हेमंत मुसरीफ पुणे

1)बया ..२) छावा ..कवी - हेमंत मुसरीफ पुणे 

बया ..

सकाळी प्रश्न पहिला 
काय म्हणतेयं रिया
गुंगी  चढतेयं  आम्हां
ती ड्रग्ज सेवते बया 

चित्र  नगरीचा पगडा 
भुलावण करते माया
मृगजळा मागे  धावा
चित्र  विचित्र किमया

ध्यान विचलीत  होते
वेळ हा किमती वाया
शेतकरी  खिन्न  छिन्न
सेलिब्रिटची येते दया

चिंता सा-या जगाची
घरी ना काही  खाया
ती   झोपली  निवांत
मैं  रात भर  न  सोया

ग्लास  फोडा  केवलं
कुछ न  खाया  पिया
सुटूनि  येणारं  बाहेर
नक्कीच ती  लिलया

२)
छावा ..

समाज रक्षक संभाजी
शिव छत्रपतींचा छावा 
स्वराज्य  माती  बोलते
असाचं  सुपुत्र असावा

बाल्यावस्थेतही  लढले
जाणला गनिमी  कावा
संसार सुखही अत्यल्प
कधी न घेतला विसावा

मावळे  शस्त्र  सुसज्ज  
चिलखताचा शोध नवा
राही  छोट्या शृंगारपुरी
रयतेची  निरीच्छ  सेवा

ना लालसा छत्र चामरी
सर्वत्र  फडकवा भगवा
आप्तांनी साधला दावा
उगाच पसरून  अफवा

औरंग्याच्या लांडग्यांनी
शरीराचा  घेतला  चावा
वेदनेचा  लवलेश  नाही
जीभेचा  जगदंब  धावा

मृत्यूही लाजून  म्हणतो
राजे  कुर्नीसात   घ्यावा
क्वचीत कदाचीत जन्मे
शतकात एखादा  छावा



कवी - हेमंत मुसरीफ पुणे 
 9730306996.
www.kavyakusum.com

No comments:

Post a Comment