प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्नालयाच्या विवीध मागण्यांन बाबत आरोग्य मंत्री सकारात्मक
सोनपेठ (दर्शन) :-
राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे परभणी जिल्हा दौऱ्यावर दि.19 आँक्टोबर 20 सोमवार रोजी आले आसता त्यांच्या बैठकीस आ.सुरेशराव वरपुडकर उपस्थित राहू न शकल्याने साहेबांची प्रतिनिधी म्हणून युवा नेत्या प्रेरणा वरपुडकर या उपस्थित राहिल्या यावेळी सोनपेठ तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रा.मुंजाभाऊ धोंडगे हे उपस्थीत होते.निवेदनात सोनपेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,शेळगाव व ग्रामीण रुग्नालय, सोनपेठ या शासकीय रुग्णालयांत रिक्त पद भरती करावी,या रुग्णालयांना आवश्यक ती साधन सामग्री व अद्ययावत यांत्रिक उपकरणांची पूर्तता करावी व सोनपेठ शासकीय रुग्णालयात आधुनिक सोयी सुविधा युक्त रुग्नवाहिका पुरवण्यात यावी तसेच मानवत तालुक्यातील कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रासह मानवत व पाथरी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सोयी सुविधा,यंत्र सामग्री व उपकरणे उपलब्ध करून देण्यात यावीत.पोखर्णी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीस मंजुरी देण्यात यावी व मतदार संघातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रां विषयीच्या मागण्या मांडल्या तसेच कोरोना बाधित रुग्ण सापडल्या नंतर त्याच्या संपर्कातील लोकांच्या कोरोणा टेस्ट तत्काळ घेण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात यावी अशा विवीध मागण्या निवेदना व्दारे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे केल्या.यावेळी या सर्व मागण्यांसंदर्भात आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी सकारात्मकता दर्शवली व यातील बऱ्याच मागण्या तत्काळ जिल्हा शल्यचिकत्सक यांना बोलून मान्य केल्या.

No comments:
Post a Comment