सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद पदाधीकारी यांच्या निवडी संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
मराठा सेवा संघाचे मुख्य मार्गदर्शक तथा सत्कारमुर्ती नुतन परभणी जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव भुसारे यांच्या उपस्थितीत दि.१०.१०.२०२० , शनिवार रोजी कै.र.व.महाविद्यालय येथे सोनपेठ तालुका मराठा सेवा संघासह जिजाऊ ब्रिगेड- जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद पदाधिकारी निवडी संदर्भात परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील बैठकी पासूनच नूतन पदाधिकारी निवडीचा प्रथम कार्यक्रम संपंन्न झाला.प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती ज्योतीताई रामेश्वर कदम तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सत्कारमूर्ती शिवमान विठ्ठलराव भुसारे सर (जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ), यांच्यासह शिवश्री बाळासाहेब यादव, शिवश्री प्राचार्य डॉ.वसंतराव सातपुते, शिवश्री एकनाथराव मस्के (मसेस महानगराध्यक्ष), शिवश्री सतिश निकम, शिवश्री सुभाष ढगे (जिल्हा प्रवक्ता मसेस), शिवमती कांचनताई कारेगावकर (जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड), शिवमती सुनिताताई जाधव (जिजाऊ ब्रिगेड), शिवश्री सुधाकरराव गायकवाड (जिल्हा सचिव), गजानन सोळंके, सतिषकुमार सातपुते, शिवश्री हनुमंत जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री अंकुशराव परांडे, तालुका सचिव शिवश्री प्रतापराव शेळके, शहर प्रमुख शिवश्री अमोल शिंदे यांची तर
जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवमती संध्याताई अच्युतराव कदम, तालुका कार्याध्यक्ष शिवमती रुक्मीनताई प्रताप शेळके यांची तर
जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या तालुकाध्यक्ष शिवमती ज्योतीताई रामेश्वर कदम, तालुका उपाध्यक्ष शिवमती अयोध्याताई घोडके, तालुका सचिव शिवमती स्वरूपाताई रामराव कदम लिंबेकर, तालुका उपाध्यक्ष शिवश्री प्रा.जिवन भोसले सर, शिवश्री कवी आभिमन्यू ह.रोडे यांची याप्रसंगी नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवश्री विठ्ठलराव भुसारे यांच्यासह शिवश्री बाळासाहेब यादव, शिवश्री प्राचार्य सातपुते सर, शिवश्री निकम सर, शिवमती कांचनताई कारेगावकर, शिवमती ज्योतीताई कदम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिवश्री नागनाथ जाधव, सूत्रसंचालन शिवश्री प्रा.डॉ.सखाराम कदम सर यांनी तर आभार प्रदर्शन शिवश्री अंकुशराव परांडे यांनी केले.याप्रसंगी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सदस्य व सदस्या मोठ्या संखेने उपस्थीत होते.नवनियुक्त सोनपेठ तालुका मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड व जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद सर्व पदाधीकारी यांचे सर्व स्तरातुन तसेच सा.सोनपेठ दर्शन परीवाराच्या वतिने शिव अभिनंदन होत असुन पुढिल वाटचालीस शुभकामना व्यक्त होताना दिसत आहेत.

No comments:
Post a Comment