सोनपेठ तालुक्यातील निळा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस शेतकऱ्यांशी संवाद साधनार !
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील निळा पाटी या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांशी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता संवाद साधून बाधित क्षेत्राची पाहणी करणार आहेत.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारकडून मदत मिळण्यासाठी मात्र उशीर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र सर्रास दिसत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे बाधीत क्षेत्राची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद दौरा आयोजित केला आहे यामध्ये सोनपेठ तालुक्यातील निळा या गावी फडणवीस भेट देऊन पुढे रवाना होतील यावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नेत्यांसमोर मागण्या माडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, सोनपेठ तालुका अध्यक्ष सुशिल रेवडकर आदिंनी केले आहे.

No comments:
Post a Comment