Saturday, October 17, 2020

परभणी जिल्हा पोलिस दलात दोन बोलेरोसह दोन अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज गाड्यांचा समावेश ; अशी चार नवीन वाहने दाखल

परभणी जिल्हा पोलिस दलात दोन बोलेरोसह दोन अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज गाड्यांचा समावेश ; अशी चार नवीन वाहने दाखल



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्हा पोलिस दलात गुरुवारी (दि.15) अत्युधुनिक सुविधा असलेली चार नवीन वाहने दाखल झाली आहेत.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, राखीव पोलिस निरीक्षक रवी दामोदर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास घटनास्थळी पोलिसांना तातडीने पोहचता यावे, क्वीक रिस्पॉन्स टीमने (क्युआरटी) त्या ठिकाणी धाव घेऊन परिस्थीत हाताळता यावी यादृष्टीने अत्याधुनिक व सुसज्ज अशा या चार वाहने गृहविभागाद्वारे पुरविण्यात आली आहेत. यात दोन बोलेरोसह दोन अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज गाड्यांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment