सोनपेठ तालुक्यात कान्हेगावचा एक बालक वीज पडून मृत्यूमुखी तर सायखेडचा बैलही दगावला
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यात परतीच्या पाऊसाने कहरच केला या पावसामुळे पुन्हा एकदा झटका बसला असून यात विजेचा कडकडासह पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील मौजे कान्हेगाव येथील 10 वर्षीय लक्ष्मण गोविंद दुगाने हा बालक वीज पडून जखमी झाला होता मात्र तात्काळ गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले तर दुसऱ्या घटनेत वीज पडुन मौजे सायखेडा येथील शेतकरी नवनाथ मारोती अरचिडे यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला.या दोनही नैसर्गिक आपत्ती मुळे ओढवलेल्या मनुष्य तसेच प्राण्यांच्या हानी मुळे पंचक्रोशितील नागरीकांच्या वतिने हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.मागील अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या संकटाने शेतकऱ्यांची झोप उडवल्याचे चित्र दिसत असतानाच सहा दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने अवकाळीच्या रूपाने पुन्हा एकदा झटका दिला असून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वच पीक हातून गेले असल्याने आणि शासनाच्या केवळ पाहणी दौऱ्याने शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे.


No comments:
Post a Comment