Saturday, October 31, 2020

सोनपेठ येथे बंजारा समाजाचे धर्मगुरु तथा अखंड बाल ब्रम्हचारी संत डाँ.रामराव महाराज यांना सर्व धर्मीय श्रद्धांजली अर्पण


सोनपेठ येथे बंजारा समाजाचे धर्मगुरु तथा अखंड बाल ब्रम्हचारी संत डाँ.रामराव महाराज यांना सर्व धर्मीय श्रद्धांजली अर्पण




सोनपेठ (दर्शन) :-

बंजारा समाजाचे धर्मगुरु तथा अखंड बाल ब्रम्हचारी संत डाँ.रामराव महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व धर्मीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक अँड.श्रीकांत विटेकर, बाबुराव जाधव, भगवान राठोड, सुभाषअप्पा नित्रुडकर, सुनिल बर्वे, संदिप भोसले, भगवान वाघमारे, मदन चव्हान, पत्रकार सुभाष सुरवसे, संपादक किरण स्वामी व बंजारा समाज बांधव आदीजन उपस्थीत होते.

Thursday, October 29, 2020

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर 2020 रोजी नांदेड येथून मोटारीने परभणी येथे सकाळी 11.30 वाजता आगमन व राखीव. दुपारी 12 ते 1.30 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), दुपारी 1.30 ते 2.30 वाजता सुरेश नागरे यांच्या परभणी निवासस्थानी राखीव. दुपारी 2.30 वाजता परभणी जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक (स्थळ-व्यंकटेश मंगल कार्यालय, एमआयडीसी परभणी), दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय परभणी), सायंकाळी 5 वाजता परभणी येथून नांदेडकडे मोटारीने प्रयाण करतील.

Wednesday, October 28, 2020

कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम

कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन)   :- 

राज्याचे सहकार, कृषी व सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा विभाग राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      गुरुवार दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 4:15 वाजता नांदेड येथून  जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय  परभणी येथे आगमन व राखीव. सायंकाळी पाच वाजता वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय परभणीकडे प्रयाण, सायंकाळी 5: 05 जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6:00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय परभणी), सायंकाळी 6:30 वाजता परभणी येथून वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
                            

कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम

कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा परभणी जिल्‍हा दौरा कार्यक्रम



परभणी / सोनपेठ (दर्शन)   :- 

राज्याचे सहकार, कृषी व सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा विभाग राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      गुरुवार दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 4:15 वाजता नांदेड येथून  जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय  परभणी येथे आगमन व राखीव. सायंकाळी पाच वाजता वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय परभणीकडे प्रयाण, सायंकाळी 5: 05 जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6:00 वाजता पत्रकार परिषद (स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय परभणी), सायंकाळी 6:30 वाजता परभणी येथून वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
                            

Monday, October 26, 2020

परभणी जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरु ठेवण्यास परवानगी

परभणी जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरु ठेवण्यास परवानगी

परभणी / सोनपेठ  :- 

शासनाच्या ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत सुट दिलेल्या बाबींमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील जिल्ह्यातील जीवनावश्यक बाबी, आस्थापना व व्यापारीक आस्थापना सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात शासनाच्या सुधारित आदेशाप्रमाणे मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधिन राहून जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दि.26 ऑक्टोबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील. ज्या आस्थापना, दुकानांना सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली नाही त्या बंद राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
                

परळी येथिल भिमवाडीची लाईट डीपी व पोलवरील तारा तात्काळ दुरुस्त करा - शुभम इंगळे

परळी येथिल भिमवाडीची लाईट डीपी व पोलवरील तारा तात्काळ दुरुस्त करा - शुभम इंगळे



परळी / सोनपेठ (दर्शन) :-

परळी शहरातील जुने रेल्वे स्टेशन भिमवाडी जाजुवाडी जवळी डीपी मधील किट कॅट डीपीला नसल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवा सोबत कुठलीही दुर्घटना होऊ नाही म्हणून भिमवाडी येथील लाईटची डीपी आणि पोलवरील तारा तात्काळ दुरुस्त करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) चे तालुका अध्यक्ष शुभम इंगळे यांनी केली आहे.

भिमवाडी जाजुवाडी जवळील डीपीत बऱ्याचदा शॉर्टसर्किट होऊन आगीच्या ठिणग्या उडतात त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच याच भागातील लाईटचे पोल कुजलेले असून त्यावरील तारा लोंबकळत असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात वारा पावसामुळे केव्हाही तुटून पडून फार मोठी हानी होऊ शकते. या हानीपासून नागरिकांना वाचवण्यासाठी महावितरण प्रशासनाने आता ठोस पावले उचलायला हवीत अशी मागणी महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता परळी वितरण विभाग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शुभम इंगळे यांनी मागणी केली आहे.

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीतच शहरातील विभागातील लाईटच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे या भागातील डीपीला व्यवस्थित दरवाजे बसवण्यात यावे लोंबत असलेल्या जुन्या तारा काढून नवीन टाकण्यात याव्यात या मागण्या पूर्ण न झाल्यास परळी महावितरण विभागासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुकाध्यक्ष शुभम इंगळे यांनी दिला आहे.

Sunday, October 25, 2020

64 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दीन "रमाई निवास" सोनखेड, सोनपेठ येथे दुसरे नागपुर अवतरले असा साजरा.....

64 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दीन  "रमाई निवास" सोनखेड, सोनपेठ येथे दुसरे नागपुर अवतरले असा साजरा.....


सोनपेठ (दर्शन) :-

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली 6 लाख अनुयायांना सोबत घेऊन बौद्ध धम्मा ची दीक्षा घेतली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्मदीक्षेचा 64 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन "रमाई निवास" सोनखेड,सोनपेठ येथे दुसरे नागपुर अवतरले असा दि.25 ऑक्टोबर 2020 रविवार रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन लाभलेले कारेक्रमाचे आयु. प्रभाकरावजी सिरसाट (सामाजीक कार्यकर्तते) , कार्यक्रमाचे उद्घाटक ॲड.सिध्दांत सिरसाट,प्रमुख उपस्थिती म्हणुन लाभलेले आयु.शिवाजीराव कदम(संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष),आयु.मुरलीधर पायघन (तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, सोनपेठ),प्रा. सतीश वाघमारे (कै. रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ),आयु.मंचक खंदारे (ग्रा. पं. सदस्य खपाट पिंप्री),आयु.किरण स्वामी (संपादक सा. सोनपेठ दर्शन),आयु.मारोती प्रधान(दिवाणी व फौजदारी न्यायालय, सोनपेठ),आयु. ज्ञानोबा रणखांबे(स्वस्त धान्य विक्रेता, थडी उक्कडगाव), लिंबाजी कसबे (स्वस्त धान्य विक्रेता, दुधगाव), रावण कसबे,प्रा.बचाटे (धामोनी),दिनकर मुंढे, विनोद गायकवाड,महादेव किरवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि धम्म विधी सचिन रणखांबे यांनी केले. इतर गावातील आणि समाजातील लहान थोर सर्वजण उपस्थित मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Saturday, October 24, 2020

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा - डॉ. नितीन राऊत {दीक्षाभूमी परिसरातील दक्षते संदर्भात प्रशासना सोबत आढावा}

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा - डॉ. नितीन राऊत
{दीक्षाभूमी परिसरातील दक्षते संदर्भात प्रशासना सोबत आढावा}



नागपूर / परभणी / सोनपेठ (दर्शन)  : -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. 
दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभाकक्षात आज आढावा बैठक घेण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या साथरोग प्रतिबंधक निर्णयानुसार दरवर्षी विजयादशमीला साजरा करण्यात येणाऱ्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’या वर्षी साजरा केला जाणार नाही. तथापि, या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यासाठी आज त्यांनी आढावा घेतला. 
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ.सुधीर फुलझेले, समितीचे सदस्य एन.आर. सुटे, विलास गजघाटे तसेच  विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, विक्रम साळी, नुरुल हसन आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
 पालकमंत्री डॉ. राऊत यांनी अनुयायांना आवाहन करताना आपल्या कुटुंबासोबत घराघरात अभिवादन करावे अशी विनंती केली आहे. यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाची झळ देशासह संपूर्ण जगाला बसत आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने नागरिकांनी कोणतेही सण, समारंभ सामुहिकरित्या साजरे करु नये, असे आवाहन केले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली होती. त्या दिवशी विजयादशमीचा सण होता. यामुळे विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी येथे  तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना  करण्यासाठी देशभरातून अनुयायी येत असतात. मात्र यंदा कोरोना संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी आपल्या घरीच धम्मचक्र प्रर्वतन दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
    रेल्वे स्टेशन तसेच बस स्थानकावर अनुयायी आल्यास गर्दी होणार नाही, यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. दीक्षाभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाईल टॉयलेल्ट्स, रुग्णवाहीका, अग्नीशामक दलाचे पथक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या बाबतही डॉ. राऊत यांनी यावेळी माहिती घेतली व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत.

विमा योजनेतील जोखीम रक्कम अदा करा ; आयसीआयसीआय, एचएफसी, अ‍ॅक्सीस या खासगी बँकांविरूध्द कारवाईची मागणी

विमा योजनेतील जोखीम रक्कम अदा करा ; आयसीआयसीआय, एचएफसी, अ‍ॅक्सीस या खासगी बँकांविरूध्द कारवाईची मागणी


परभणी / सोनपेठ  (दर्शन) :-

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी, पूर व अतिरीक्त पावसामुळे पीकबुडी झालेल्या शेतकर्‍यांना विमा योजनेतील जोखीम रकमे इतकी आर्थिक मदत वितरित करावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या जिल्ह्यात परतीच्या पावसाने, अतिवृष्टी व पुराने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनागोंदीने शेतकर्‍यांच्या शेतातील माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली. त्या ठिकाणी खड्डे पडले. त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या पदरी कायम नापिकी आली असल्याचा आरोप संघर्ष समितीने केला. अशा या आपतकालीन स्थितीत शेतकर्‍यांना मदतीची आवश्यकता आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तरतुदी शेतकरी विरोधी आहेत, केंद्र शासनाने शेतकर्‍यांच्या आंदोलनानंतर देखील तरतुदी बदलल्या नाहीत. राज्य सरकारने जोखीम स्तर 70 टक्के ठेवल्याने शेतकर्यांना पीकविमा भरपाई मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यातच रिलायन्स जनरल इंश्युरन्स या कंपनीने मागील अनुभवाप्रमाणे शासनाबरोबरीच्या करारातील तरतुदींचा भंग करून शेतकर्‍यांची फसवणूक चालवली आहे. ऑगस्ट व ऑक्टोबरमधील अतिवृष्टीने मूग, सोयाबीन, कापूस, उडीद, तूर या पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या नोंदी 72 तसात संबंधित कंपनीने नोंदविण्याकरिता अ‍ॅसेसर नेमले नाहीत. त्यामुळेच कंपनीच्या शेतकरी विरोधी कार्यपध्दतीने शेतकर्‍यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असे मत कॉ.राजन क्षिरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम, अ‍ॅड. लक्ष्मण काळे, नितीन सावंत, ज्ञानेश्वर काळे, मुंजा लिपने, श्रीनिवास वाकणकर, नवनाथ कोल्हे, शेख अब्दूल, शेख अनिस,भारत फुके, प्रसाद गोरे आदीनी व्यक्त केले. विमायोजनेतील जोखीम रकमेईतकी म्हणजे सोयाबीनसाठी 45 हजार 500 रुपये आर्थिक मदत शेतकर्यांना द्यावी, जमिनीचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये जमीन दुरूस्तीसाठी आनुदान द्यावे, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत भ्रष्ट साखळीविरूध्द गुन्हे दाखल करावेत, खरीप नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी, रब्बीसाठी शेतकर्‍यांना पीककर्ज द्यावे तसेच कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवणार्‍या आयसीआयसीआय, एचएफसी, अ‍ॅक्सीस या खासगी बँकांविरूध्द कारवाई करावी, तसेच सीसीआय व नाफेडमार्फत कापूस खरेदी सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली.

प्रा.डॉ.सुनिता टेंगसे यांच्या कडून वाढदिवसाच्या निमित्त ग्रंथ भेट देण्याची परंपरा कायम

प्रा.डॉ.सुनिता टेंगसे यांच्या कडून वाढदिवसाच्या निमित्त ग्रंथ भेट देण्याची परंपरा कायम


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील कै रमेश वरपूडकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय समितीच्या वतीने महाविद्यालयाशी संबंधित प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथभेट देण्यात येतात. समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुनिता टेंगसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट देऊन ही परंपरा कायम ठेवण्यात आली.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, आयक्यूएसी समन्वयक प्रा.डॉ. मुकुंद पाटील, ग्रंथपाल प्रा.डाॅ. आनंत सरकाळे उपस्थित होते.कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या ग्रंथालय सल्लागार समितीने अभिनव उपक्रम म्हणून वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट देण्याची पद्धती महाविद्यालयांमधील रूढ केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख व ग्रंथालय सल्लागार समितीच्या सदस्य प्रा.डॉ. सुनिता टेंगसे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त 1250 रुपये किमतीचे सात पुस्तके महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट देऊन साजरा केला,यानिमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमासाठी प्राचार्य वसंत सातपुते यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच ग्रंथपाल प्रा.डॉ.अनंत सरकाळे यांनी ग्रंथ भेट स्वीकारली, यावेळी इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसा निमीत्त शेतकऱ्यांला मदत

मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या वाढदिवसा निमीत्त शेतकऱ्यांला मदत


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यातील मौजे सायखेडा येथे  दि 24 आक्टोंबर शनिवार रोजी भाजपा नेते परभणी जिल्ह्याच्या राजकारणातले  भिष्माचार्य मा.आ.रामप्रसादजी बोर्डिकर यांच्या वाढदिवसा निमीत्त भारतीय जनता पार्टी सोनपेठ च्या वतीने मौजे सायखेडा ता.सोनपेठ येथिल शेतकरी नवनाथ मारोती आरचिडे यांच्या बैलाचा वीज पडुन म्रुत्यु झाला पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळलेला बैल आईन पेरणीच्या तोंडावर गेल्यामूळे या परिवारावर खुप मोठे संकट आले आहे. म्हनुन मा.ना.रामप्रसाद बोर्डिकर यांच्या सुचनेनुसार या संकटग्रस्त कुंटुंबास भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने भेट दिली व 11000 रु ची मदत दिली.या प्रसंगी भाजपा चे बाळासाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, तालुका अध्यक्ष सुशील रेवडकर, पदाधिकारी व गावकरी उपस्थीत होते.

सा.सोनपेठ दर्शन दिपावली व वर्धापन दिन जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.


Thursday, October 22, 2020

सोनपेठ तालुक्यात कान्हेगावचा एक बालक वीज पडून मृत्यूमुखी तर सायखेडचा बैलही दगावला

सोनपेठ तालुक्यात कान्हेगावचा एक बालक वीज पडून मृत्यूमुखी तर सायखेडचा बैलही दगावला





सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ तालुक्यात परतीच्या पाऊसाने कहरच केला या पावसामुळे पुन्हा एकदा झटका बसला असून यात विजेचा कडकडासह पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील मौजे कान्हेगाव येथील 10 वर्षीय लक्ष्मण गोविंद दुगाने हा बालक वीज पडून जखमी झाला होता मात्र तात्काळ गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले तर दुसऱ्या घटनेत वीज पडुन मौजे सायखेडा येथील शेतकरी नवनाथ मारोती अरचिडे यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला.या दोनही नैसर्गिक आपत्ती मुळे ओढवलेल्या मनुष्य तसेच प्राण्यांच्या हानी मुळे पंचक्रोशितील नागरीकांच्या वतिने  हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.मागील अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या संकटाने शेतकऱ्यांची झोप उडवल्याचे चित्र दिसत असतानाच सहा दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने अवकाळीच्या रूपाने पुन्हा एकदा झटका दिला असून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्वच पीक हातून गेले असल्याने आणि शासनाच्या केवळ पाहणी दौऱ्याने शेतकरी हवालदिल झालेला दिसत आहे. 

पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 

राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे शुक्रवारी (दि.23) परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

दि.23 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता औरंगाबाद येथून निघून मौजे हादगाव ता.सेलू येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. सकाळी 11 वाजता ढेंगळी पिंपळगाव येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची ते  पाहणी करतील. सकाळी 11.45 वाजता मौजे कोल्हा ता.मानवत येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची पाहणी करणार असून दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह सावली येथे आगमन होईल. दुपारी 1 वाजता अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीबाबत, कोविड-19 व जिल्ह्यातील इतर महत्वाच्या विषयाबाबत सर्व शासकीय यंत्रणेसमवेत श्री मलिक हे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी 2.30 वाजता परभणी येथून शासकीय वाहनाने पाथरीकडे प्रयाण करतील. दुपारी 3.30 वाजता मौजे रामपुरी ता.पाथरी येथे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची ते पाहणी करतील व सायंकाळी 4 वाजता शासकीय वाहनाने माजलगाव मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

Wednesday, October 21, 2020

नारायणराव कुंभारीकर यांचे निधन ; भावपुर्ण श्रद्धांजली

नारायणराव कुंभारीकर यांचे निधन ; भावपुर्ण श्रद्धांजली 


सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथिल पत्रकार शिवाजी कुंभारीकर यांचे वडिल नारायणराव श्रीनिवासराव कुंभारीकर वय 78 यांचे दुःखद निधन झाले आहे.दि.21 आँक्टोबर 2020 बुधवार रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांचावरती सार्वजनिक स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी समाज बांधव, नातेवाईक व सर्व स्तरातील नागरीक, मित्र परीवार उपस्थीत होते. 
त्यांच्या पश्च्यात पत्नी, चार मुल, सुना, नातवंड असा मोठा परीवार आहे.सा.सोनपेठ दर्शन परीवार,  सोनपेठ तालुका पत्रकार संघ तसेच वृतपत्र विक्रेता संघटना सोनपेठ यांच्या वतिने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सोनपेठ महावितरण यांच्या कडून आकड्यावर कार्यवाही सुरूच...

सोनपेठ महावितरण यांच्या कडून आकड्यावर कार्यवाही सुरूच...



सोनपेठ (दर्शन) :-

दि.20 आँक्टोबर 2020 पासून कार्यकारी अभियंता 2 जमदाडे यांच्या आदेशावरून सोनपेठ उपविभाग महावितरण कार्यालय कडून वीज चोरी पकडणे मोहीम चालू केले आहे. दि.20 आँक्टोबर 2020 ला धमोणी येथे 61 ग्राहकांवर वीज चोरी आकडे पकडले होते तसेच दि.21 आँक्टोबर 2020 ला वानीसांगम येथे 78 ग्राहकाचे वीज चोरीचे आकडे पकडून कार्यवाही करण्यात आले आहे. सोनपेठ तालुक्यातील सर्व ग्राहकांना आवाहन करत आहे की वीज चोरीचे आकडे टाळा आणि वीज बिल भरून महावितरण सोनपेठ याना सहकार्य करावे असे उपकार्यकरीअभियंता दिनेश हनवते यांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलताना सांगितले यावेळी महेश चौखे कनिष्ट अभियंता, तसेच महावितरण चे कर्मचारी डोगरे, बळवंत , देवमरे, माखनिकर , अरसुले, आदी कर्मचारी वीज चोरीचे आकडे शोध मोहीम मध्ये सहभागी होते.

Tuesday, October 20, 2020

पोलिस स्मृतिदिन नायगाव पोलिस मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली

पोलिस स्मृतिदिन नायगाव पोलिस मुख्यालयात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली



सोनपेठ (दर्शन) :- 

देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना दि.21 आँक्टोबर 20 बुधवार रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलिस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्ताने पोलिस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख , गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील , गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित होते.

परभणी जिल्हा पोलिस दलातील दहा कर्मचारी होणार फौजदार

परभणी जिल्हा पोलिस दलातील दहा कर्मचारी होणार फौजदार 



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्हा पोलिस दलातील दहा पोलिस कर्मचार्‍यांना सोमवारी (दि.20) फौजदारपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
2013 साली राज्यातील पोलिस अंमलदारांची विभागीय परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी हजारो अंमलदार परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, मागील सात वर्षांपासून ते आपल्या खांद्यावर दोन स्टार कधी मिळतात याकडे डोळे लाऊन होते. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस महासंचालक कार्यालयाने पदोन्नती देण्यासाठी संबंधितांची माहिती मागवली. सतत सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राज्यातील एक हजार 61 पोलिस कर्मचारी फौजदार होणार आहेत. त्यात परभणीतील दहा जणांचा समावेश आहे. यात चंद्रचूड हत्तेकर, माधव (अण्णा) लोकूलवार, साहेब चौरे, गणेश कदम, प्रभाकर अंभोरे, राजू ननवरे, भगवान जाधव, मारोती फड, प्रकाश पंडीत, सय्यद अहेमद यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 267 रुग्णांवर उपचार सुरू, 21 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 267 रुग्णांवर उपचार सुरू,  21 रुग्णांची वाढ




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

जिल्ह्यातील 21 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 286 एवढी झाली आहे. त्यापैकी  5 हजार 764 बरे झाले तर 255 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 267 जणांवर उपचार सुरु आहेत.  सोमवार दि.20 ऑक्टोबर 2020 रोजी एकुण 48 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 691 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 267 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 424 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

सोनपेठ महावीतरण ची आकडे पकडो मोहीम चालु ; धामोनी येथे 61 आकडे पकडले

सोनपेठ महावीतरण ची आकडे पकडो मोहीम चालु ; धामोनी येथे 61 आकडे पकडले




सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ एम.एस.ई.बी.उपविभाग मधून दि.20 आँक्टोबर 20 मंगळवार पासुन आकडे टाकून वीज चोरी होत असल्याने रोहित्रावर अधिक भार येवून मोठया प्रमाणात रोहित्र जळत आहेत. त्यामुळे महावितरणला रोहित्र दुरूस्तीच्या खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.रोहित्र दुरूस्ती करून पुन्हा वीज पुरवठा पूर्ववत करे पर्यंत ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागते. त्यामुळे आकडे टाकून होत असलेली वीज चोरी थाबंवून रोहित्र वाचविण्यासाठी वीज चोरी पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.मा.कार्यकारी अभियंता विभाग 2 यांच्या आदेशावरून सोनपेठ उपविभाग येथे वीज चोरी आकडे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.धामोणी या गावात 61 ग्राहकांचे वीज चोरी आकडे कडून रोहित्र जवळ वायर चे तुकडे करून ग्राहकांना आवाहन केले की वीज चोरीवर कडक कार्यवाह होणार असून नवीन वीज जोडणी चा अर्ज करून महावितरण चे ग्राहक होऊन वीज बिल भरून महावितरण ला सहकार्य करावे असे आवाहन हनवते उपकार्यकरी अभियंता यांनी दिले आहे. या कारवाहीत हनवते उपकार्यकरी अभियंता सोबत चौखे कनिष्ठ अभियंता तसेच कर्मचारी बळवंत कुकर, डोंगरे, पठाण, कांबळे, मुंडे आदी कर्मचारी सहभागी होऊन वीज चोरी मोहीम सुरुवात करण्यात आली.

सा.सोनपेठ दर्शन बातम्या व जाहीरातीसाठि
संपर्क संपादक  किरण रमेश स्वामी मो.9823547752.


Monday, October 19, 2020

सोनपेठ तालुक्यातील निळा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस शेतकऱ्यांशी संवाद साधनार !

सोनपेठ तालुक्यातील निळा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस शेतकऱ्यांशी संवाद साधनार !



सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील निळा पाटी या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांशी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2020 मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता संवाद साधून बाधित क्षेत्राची पाहणी करणार आहेत.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारकडून मदत मिळण्यासाठी मात्र उशीर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र सर्रास दिसत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे बाधीत क्षेत्राची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद दौरा आयोजित केला आहे यामध्ये सोनपेठ तालुक्यातील निळा या गावी फडणवीस भेट देऊन पुढे रवाना होतील यावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नेत्यांसमोर मागण्या माडण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे,  सोनपेठ तालुका अध्यक्ष सुशिल रेवडकर आदिंनी केले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्नालयाच्या विवीध मागण्यांन बाबत आरोग्य मंत्री सकारात्मक

प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्नालयाच्या विवीध मागण्यांन बाबत आरोग्य मंत्री सकारात्मक



सोनपेठ (दर्शन) :-

राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे परभणी जिल्हा दौऱ्यावर दि.19 आँक्टोबर 20 सोमवार रोजी आले आसता त्यांच्या बैठकीस आ.सुरेशराव वरपुडकर उपस्थित राहू न शकल्याने साहेबांची प्रतिनिधी म्हणून युवा नेत्या प्रेरणा वरपुडकर या उपस्थित राहिल्या यावेळी सोनपेठ तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रा.मुंजाभाऊ धोंडगे हे उपस्थीत होते.निवेदनात सोनपेठ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,शेळगाव व ग्रामीण रुग्नालय, सोनपेठ या शासकीय रुग्णालयांत रिक्त पद भरती करावी,या रुग्णालयांना आवश्यक ती साधन सामग्री व अद्ययावत यांत्रिक उपकरणांची पूर्तता करावी व सोनपेठ शासकीय रुग्णालयात आधुनिक सोयी सुविधा युक्त रुग्नवाहिका पुरवण्यात यावी तसेच मानवत तालुक्यातील कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रासह मानवत व पाथरी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सोयी सुविधा,यंत्र सामग्री व उपकरणे उपलब्ध करून देण्यात यावीत.पोखर्णी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीस मंजुरी देण्यात यावी व मतदार संघातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रां विषयीच्या मागण्या मांडल्या तसेच कोरोना बाधित रुग्ण सापडल्या नंतर त्याच्या संपर्कातील लोकांच्या कोरोणा टेस्ट तत्काळ घेण्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात यावी अशा विवीध मागण्या निवेदना व्दारे  आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांच्याकडे केल्या.यावेळी या सर्व मागण्यांसंदर्भात आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी सकारात्मकता दर्शवली व यातील बऱ्याच मागण्या तत्काळ जिल्हा शल्यचिकत्सक यांना बोलून मान्य केल्या.

आरोग्य यंत्रणेने संपर्कातील व्यक्तीची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा - आरोग्य‍ मंत्री राजेश टोपे

आरोग्य यंत्रणेने संपर्कातील व्यक्तीची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा - आरोग्य‍ मंत्री राजेश टोपे




परभणी / सोनपेठ (दर्शन)  :-  

कोविड-19 विषाणूची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड-19 मधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तीची तातडीने चाचणी  करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी संबंधितांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोविड-19 आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे,  आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर-साकोरे, आरोग्य सभापती श्रीमती अंजली आणेराव, जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री टोपे म्हणाले की,  जिल्ह्यातील कोविड-19 मधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधित व्यक्ती ज्या व्यक्तींच्या संपर्कात आलेला आहे त्या सर्वांची चाचणी करावी. यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगून याबाबत आरोग्य यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी.  आरोग्य विभागातील सर्व डॉक्टरांनी  कोविडमध्ये तत्परतेने काम करावे. याकामी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तीश: लक्ष घालावे. तसेच या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचा अभाव असता कामा नये. यासाठी डॉक्टर्स, नर्स कमी पडत असल्यास ते कंत्राटी तत्वावर थेट मुलाखतीच्या माध्यमातून नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे प्रक्रिया राबवावी. परंतु कोविडच्या रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड सेवेसाठी 24 तास वॉररुम उपक्रम उपलब्ध असल्याने याचे मंत्री महोदयांनी कौतूक केले. तसेच टेली  आयसीयुही बसवावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 
जिल्ह्यातील कोविडबाबतची सर्व माहिती नियमितपणे डॅशबोर्डवर अपलोड करावी जेणेकरुन कोविडविषयक माहिती सर्वाना उपलब्ध होईल. टेस्ट पर मिलियन वाढविणे गरजेचे असून शंभर टक्के  डॉक्टरांना कोविडमध्ये काम करण्यासाठी समाविष्ट करावे. तसेच या आपत्तीच्या कालावधीत आयएमएच्या डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे सांगून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा रुग्णालयांचा समावेश असल्याने त्याचा फायदा सर्व नागरिकांना मिळवून द्यावा, असेही श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले. 
बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी जिल्ह्यातील कोविड-19 परिस्थितीबाबत सविस्तरपणे सादरीकरणाद्वारे माहिती उपलब्ध करुन दिली. तसेच यावेळी आरोग्य मंत्री श्री.टोपे यांच्याहस्ते कोविड दरम्यान सर्वोकृष्ट कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा व संबंधितांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंकरराव देशमुख, उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्यासह आरोग्य विभाग आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-*-