नीट परिक्षेसाठी पाथरी आगाराकडून विशेष बसेस ; लातूर, नांदेड, औंरंगाबादला जाण्यासाठी सुविधा
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नीट परिक्षेसाठी पाथरी आगाराकडून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली असून दि.12 सप्टेंबर रोजी लातूर, नांदेड, औंरंगाबादला जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
दि.13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या पाथरी आगारातर्फे दि.12 सप्टेंबर रोजी पाथरी, सेलू व मानवत येथून लातूर,नांदेड व औरंगाबाद करिता विशेष ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
दिनांक 12 सप्टेंबर रोजी पाथरी-औरंगाबाद बसेस सकाळी 7.15, 7.45, 9.00, 12.00, दुपारी 2 वाजता सोडण्यात येतील. पाथरी-लातूर मार्गावरील बसेस सकाळी 7.15, दुपारी 2.30 वाजता, पाथरी-नांदेड बसेस दुपारी 12 सोडण्यात येतील.
तसेच 13 सप्टेंबर रोजी पाथरी-औरंगाबाद बसेस पहाटे 5.00 वाजता तर पाथरी-लातूर (सोनपेठ मार्गे) ही बस पहाटे 5.00 वाजता आणि पाथरी-नांदेड ही बस देखील पहाटे 5.00 वाजता सोडण्यात येणार आहे. मागणीनुसार ज्यादा बसेस सोडण्यात येतील. सदर बस आरक्षणासाठी महामंडळाच्या ओआरएस प्रणालीवर उपलब्ध आहे. परतीच्या प्रवासासाठी सदरील बसेस परीक्षा झालयानंतर जवळील बसस्थानकावरुन दोन तासानंतर सुटतील.अधिक माहितीसाठी मो.न 9527072967, 9420862797 वर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment