अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाच्या वतीने महानगरपालिकांच्या कोरोना योद्धांचे सत्कार
परभणी / सोनपेठ (दर्शन): -
कोरोना काळात शहर महानगरपालिकेचे काम करणारे विविध क्षेत्रातील अधिकारी , कर्मचारी यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष अब्दुल रहीम यांच्या वतीने सत्कार करण्यात आले . परभणील शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता समाजावर जे संकट निर्माण झाले आहे , त्या संकटांना सामोरे जाऊन जे खरी समस्या सोडवतात तेच खरे ' कोरोना योद्धा ' असतात . कोरोना काळात सहकार्य करणाऱ्या परभणी शहर महानगरपालिकाचे स्वच्छता विभागाचे अधिकारी , कामाटी , कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्याचे काम केलेले आहे . या कोरोना योद्धांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी मनपाच्या स्वच्छता विभागाचे मुखतसीद खान ( नोडल अधिकारी ) , अब्दुल शादाब ( स्वच्छता निरीक्षक ) , दिपक कानोडे ( प्रभावी अग्निशामक दल अधिकारी ) , कर्मचारी गणेश गायकवाड , अहमद भाई , सामाजिक कार्यकर्ते ईश्वरलाल , बालाजी काकडे , रशीद भाई , प्रफुल पैठणे , लक्ष्मणराव जोगदंड , गौतम वावळे तसेच या क्षेत्रातील अनेक कामाटीतसेच, श्री स्वामी समर्थ शिवाजीनगर येथील जे सेवेकरी आहेत व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक धाराजी भुसारे , जिल्हा सदस्य के.बी.शिंदे , तालुका अध्यक्ष अब्दुल रहिम , तालुका सचिव सय्यद रफिक पेडगावकर , योगिराज वाकुडे , विजय सोपानराव चट्टे , बाबासाहेब भोसले , मुशरफ खान आदींची उपस्थिती होती .

No comments:
Post a Comment