विशेष महानिरीक्षक निसार तांबोळी यांची परभणी भेट ; कोरोना योध्दा आर.एम.स्वामी यांना श्रध्दांजली
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक या पदाची सुत्रे निसार तांबोळी यांनी 5 सप्टेंबरला स्विकारली असून आज मंगळवारी दिनांंक 15 सप्टेंबर रोजी त्यांनी परभणीला भेट दिली. पोलिस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांची पाहणी करुन घेतलेल्या पहिल्याच बैंठकीत त्यांनी परभणी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतला. तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने अधिकार्यांना सूचना दिल्या.
या बैंठकीस पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलिस अधीक्षक आर.रागसुधा, सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाडे, डीवायएसपी श्रवण दत्त, बलराज लांजिले यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक तांबोळी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश केल्यानंतर विविध विभागाच्या कक्षांमध्ये जावून कामाची पाहणी केली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व अधिकार्यांची बैंठक घेतली.
जिल्ह्यातील जिंतूर ठाण्यातील कोरोना योद्धा पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. जिंतूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक आर.एम.स्वामी यांचा 9 सप्टेंबर रोजी रात्री कोरोनाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पार्श्वभुमीवर झालेल्या ़आजच्या ़बैंठकीत सुरुवातीला सर्वांनी दिवंगत कोरोना योद्धा पोलिसास श्रध्दांजली अर्पण केली. बैंठकीत कोविडच्या अनुषंगाने विशेष महानिरीक्षक तांबोळी यांनी अधिकार्यांना सूचना देत ऑनलाईन तक्रारी नोंदवून घेण्याबाबत सांगितले.
सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.


No comments:
Post a Comment