Sunday, September 6, 2020

माविमकडून उखाणा स्पर्धेचे आयोजन

माविमकडून उखाणा स्पर्धेचे आयोजन


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-  

महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेच्या जीवनातील जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय म्हणजे उखाणा घेणे अस म्हटल तर वावगे ठरणार नाही. हीच गोष्ट नजरेसमोर ठेवून कोव्हिडच्या सध्याच्या निराशामय काळात महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गौरी गणपती आणि येणारी नवरात्र या पार्श्वभूमीवर महिलांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून (माविम) ऑनलाईन उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली असून प्रवेश नि:शुल्क आहे. ज्या महिलांना स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे त्यांनी नाविण्यपूर्ण, जनजागृती करणारे, सामाजिक आशय असणारे तसेच ऐतिहासिक मुल्य असणारे यापैकी एक उखाण्याचा कमीत कमी दीड ते जास्तीत जास्त तीन मिनिटांचा व्हिडीओ तयार करुन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास पाठवावेत. अधिक माहितीसाठी मो.9850637009 किंवा दुरध्वनी क्र.02452-234273 यावर संपर्क साधावा. असे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती निता अंभोरे यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment