Monday, September 7, 2020

भगवान किरवले सेवानिवृत्त न.प. कर्मचारी हक्काच्या पैस्यासाठी मा.मुख्यमंत्री यांना तक्रार

भगवान किरवले सेवानिवृत्त न.प. कर्मचारी हक्काच्या पैस्यासाठी मा.मुख्यमंत्री यांना तक्रार
सोनपेठ (दर्शन) :-
 
मा.श्री.दी.म.मुगळीकर साहेब (भा.प्र.से.) जिल्हा अधिकारी,परभणी.आपले.आदेश क्र.2020/नपाप्र/लेखा/01/कावी/दिनांक 04-08-2020 नुसार रुपये 1,37,108/-मिळणे बाबत.चा अर्ज दिनांक:-3 सप्टेंबर 2020.वरील विषयी संदर्भिय पत्रा नुसार वारंवार अर्जाद्वारे, प्रत्यक्ष भेटून व फोनवर बोलून या विषया बाबत भगवान बापूराव किरवले ( सेवा निवृत्त न.प. कर्मचारी)  रा.सोनपेठ. (भिमगड), ता.सोनपेठ 
 अनेक वेळा अपणाकडे विनंती केली आहे.        आपण दि.27 ऑगस्ट 2020 रोजी फोनवर भगवान किरवले यांना सांगितले होते की, "मी स्वतः ट्रेझरी ऑफिसरला बील पास करून देण्यास सांगतो."तसेच दि.1सप्टेंबर2020 रोजी निवासी उपजिल्हाधीकारी सूर्यवंशी मॅडम यांनी मला फोनवर सांगितले होते की,"मी बगाटे मॅडम (कोषागार अधिकारी) यांना कालच बील पास करून देण्यास सांगितले आहे. वाटल्यास तुम्ही बगाटे मॅडम यांना भेटा."परंतु बगाटे मॅडम यांच्याकडे दि.1 सप्टेंबर 2020 रोजी याबाबत चौकशी केली असता. त्यांनी असे सांगितले की,"भगवान किरवले यांनी पंधरा-वीस दिवसां पूर्वीच गाजरे (लिपीक) यांना सांगितले होते की, GR हेड नं.बदलून द्या.त्यांनी काही अजून ते पाठवले नाही."या प्रकारे मागील आठ महिन्यांपासून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपणाकडून टाळाटाळ केल्या जात आहे.वैद्यकीय कारणासाठी मला पैशांची नितांत गरज असून माझे हक्काचे पैसे देण्याची माझ्यासारख्या वृध्दावर दया करावी ही विनंती.करुन मा.मुख्यमंत्री यांना ही तक्रार मेल केली आहे.
                 
                              

No comments:

Post a Comment