हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील कै. रमेश वरपुड़कर महाविद्यालयामध्ये हिंदी भाषा विभागाच्या वतीने हिंदी दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, विभाग प्रमुख प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी, प्रा. डॉ.शिवाजी वडचकर आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील उपस्थित होते.
शहरातील कै रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने, हिंदी दिवस या भित्तीपत्रकाचे विमोचन, ऑनलाइन व्याख्यान व विद्यार्थ्यांनी प्रदर्शीत केलेली मते यांचे व्हिडीओ मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शीत करण्यात आले. हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.कुलकर्णी तसेच प्रा.डॉ. वडचकर यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केला या कार्यक्रमासाठी मा. रामेश्वर कदम प्रा. डॉ. सुनिता टेंगसे ,प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये , प्रा.डॉ. शिवाजी अंभुरे , प्रा. डॉ. बी.एम.काळे, प्रा.महालिंग मेहेत्रे, प्रा.डॉ. गोविंद वाकणकर, श्री तुकाराम तळेकर , श्री संतुक परळकर यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन गजानन खरात तर आभार प्रा.डॉ. शिवाजी वडचकर यांनी मानले.
आपल्या परीवारातील लहान थोरांच्या वाढदिवसाच्या तसेच आपल्या व्यापाराच्या जाहीरातीसाठी व बातम्यासाठी सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752


No comments:
Post a Comment