जिल्हाधिकारी मुगळीकर यांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा
पालम तालुक्यत गेल्या दहा दिवसापूसन होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील हजारो शेतकर्यांच्या पिकांची नासाडी झाली असून या आस्मानी संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या शेतकर्यांना मदत मिळवून देण्यासाठी आमदार डा. रत्नाकर गुट्टे प्रयत्नशील असून आज जिल्हाधिाकरी दिपक मुगळीकर यांनी पालम तलाुक्याचा पाहणी दोरा केला. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जात पाहणी केल्यानं शेतकर्यांच्या व्यथा जिल्हाधिकार्यांच्या समोर आल्यात. रावराजुर येथे काही शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं वाहनं जात नव्हती त्या ठिकाणी चक्क जिल्हाधिकार्यांना बेलगाडीत बसवून आमदार गुट्टे घेवून गेले आणि पाहणी केली यामुळे आमदार गुट्टे यांनी जिल्हाधिकार्यांना बेलगाडीचा प्रवास घडविल्याचे दिसून आले.गेल्या दहा दिवसापासून परिसरात आसलेल्या मुसळधार पावसामुळे पालम तालुक्यातल्या अनेक गावांना फटका बसला आहे. तर नदी नाल्यांना आलेल्या पुरानेही शेतकर्यांची पिके वाहून गेली आहेत. यामध्ये कापूस, सोयाबीन व उस या पिकांची मोठी नासाडी झाली आहे. या शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डा. रत्नाकर गुट्टे यांनी प्रशासनासोबतच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडेही केली. राज्यस्तरावरून पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी पालम तलाुक्यातील रावराजुर, रोकडेवाडी,केरवाडी, पालम आदी गावातील नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी दोरा केला.या दौर्यात त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार ज्योती चव्हाण,जिल्हा अध्यक्ष अँड संदीप अळनुरे,पालम पुर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष असदख पठाण,नगरसेवक संजय थिटे,शेख गौस,शिवराम पैके, चंद्रकांत गायकवाड राहुल शिंदे बाळासाहेब फूलपगार ,नारायण झिलेवाडआदींसह पदाधिकारी उपस्थित हेाते. जिल्हाधिाकरी यांनी पालम तलाुक्याल्या रावराजुर, रोकडेवाडी, केरवाडी व पालम या गावच्या शेतकर्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे रावराजूर या गावातील शेतकर्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी वाहन जात नसल्यानं आमदार गुट्टे यांनी बेलागाडी मागवून जिल्हाधिकार्यांना प्रत्यक्ष शेतर्यांच्या बांधावर नेले. या दोर्यात रासप व आमदार गुट्टे मित्रमंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित हेाते.
सा.सोनपेठ दर्शन बातम्या व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी.मो.9823547752 .



No comments:
Post a Comment