डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद ; मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो - अमित देशमुख
अहमदपुर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारे राष्ट्रसंत आध्यात्मिक गुरु डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. आज मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी अहमदपूर येथील भक्ती स्थळ येथे जाऊन राष्ट्रसंत आध्यात्मिक गुरु डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी धर्माचरण व ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले.आयुष्यभर त्यांनी सामाजिक चळवळ व प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.अमित विलासराव देशमुख
(वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर) यांनी दि.15 सप्टेंबर रोजी त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
यावेळी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राजेश्वर निटूरे, अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.गणेश कदम, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, उपविभागीय अधिकारी महसूल प्रभोदय मुळे, तहसीलदार महेश सावंत, सभापती शिवानंद हिंगणे, कल्याण पाटील, श्याम महाजन, चंद्रकांत मद्दे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment