Tuesday, September 15, 2020

आज दिले निवेदन कोव्हीड 19 आजाराच्या धर्तीवर सोनपेठ बाजारपेठ शुक्रवार ते गुरुवार सात दिवस बंद ; शासनाच्या नियमांचे पालन करा....

आज दिले निवेदन कोव्हीड 19 आजाराच्या धर्तीवर सोनपेठ बाजारपेठ शुक्रवार ते गुरुवार सात दिवस बंद ; शासनाच्या नियमांचे पालन करा....


सोनपेठ (दर्शन) :-

कोव्हीड 19 आजाराच्या धर्तीवर वाढत्या रुग्णसंख्येने जनजिवण विसकळीत झाले आहे.तरी इतर आजारामुळे लोक त्रस्त होत असल्याचे प्रकारही समोर येत असतानाच सोनपेठ येथील व्यापारी महासंघाने दि.16 सप्टेंबर 2020 बुधवार रोजी दिले तहसीलदार डाँ.आशिषकुमार बिरादार यांन निवेदन सोनपेठची व्यापारपेठ येत्या दि.18 सप्टेंबर 2020 शुक्रवार ते दि.24 सप्टेंबर 2020 गुरुवार पर्यंत सात दिवस बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे.मागील अनेक दिवसांपासून सोनपेठ प्रशासनाकडून उपाययोजना करूनही कोरोना हा आजार पाठ सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे.सुरक्षिततेचे नियम पाळूनही ग्रामीण भागातील लोकांची गर्दी टळत नसल्याने सोनपेठच्या व्यापारी महासंघाने याबाबत एक बैठक आयोजित करत सात दिवसाचा बंद पाळण्याचे ठरवले आहे.याबाबतचे अधिकृत निवेदन व्यापारी महासंघ बुधवार रोजी सोनपेठचे तहसीलदार यांच्याकडे दिले असल्याचे व्यापारी महासंघाकडून कळविण्यात आले आहे.या बैठकीस सर्व स्तरातील व्यापारी यांच्यासह सह सर्वपक्षीय कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.तरी नागरीकांना अवाहन आहे कि आपन आपल्या परीवाराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन शासनाच्या नियमांचे पालन करा.सामाजीक अंतर पाळुन, मास्कचा काटेकोरपणे वापर करुन, सँनिटायझर वापरुन सुरक्षीत रहा व इतरांना ही सुरक्षीत ठेवा.सतत हात धुऊन रोगराई टाळा सा.सोनपेठ दर्शन शी बोलताना ग्रामिण रुग्नालय आधिक्षक डाँ.सिध्देश्वर हालगे यांनी सर्व कोरोना योध्दांच्या वतिने कळकळीचे अवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment