Saturday, September 19, 2020

पंतप्रधान, कृषीमंत्र्यांना पाठवली कांद्याची भेट ! ; गंगाखेड कॉंग्रेसचे अभिनव आंदोलन

पंतप्रधान, कृषीमंत्र्यांना पाठवली कांद्याची भेट ! ; गंगाखेड कॉंग्रेसचे अभिनव आंदोलन 



गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) : - 

केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लादली आहे. ती ऊठवावी या मागणीसाठी आज गंगाखेड तालुका कॉंग्रेसने अभिनव आंदोलन केले. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंताप्रधान आणि कृषीमंत्र्यांना कांदे भेट पाठवाण्यात आली. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने ही बंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी केली. 

मोठ्या प्रमाणात ऊत्पादन झालेल्या कांद्यास चांगला भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातीस बंदी घातली. यामुळे कांद्याचे भाव गडगडले आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. ही बंदी ऊठवावी, अशी मागणी देशभरातून केली जात असताना गंगाखेड तालुका कॉंग्रेसने आज अभिनव आंदोलन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसींह तोमर यांना गंगाखेड तहसीलदारांमार्फत दोन पीशवी कांदे भेट म्हणून पाठवण्यात आले. केंद्र शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधने हाच या भेटीमागचा ऊद्देश असल्याचे यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी सांगीतले. युवानेते सुशांत चौधरी यांनी ही अयोग्य बंदी तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. नगरसेवक प्रमोद मस्के, युवक कॉॅंग्रेसचे विधानसभा सचीव, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव, शहराध्यक्ष नागेश डमरे, प्रभाकर सातपुते, अजय कुकाले, वसंतराव गेजगे, निवृत्ती केदारे, अर्जुन भोसले आदिंसह शेतकरी, पदाधिकाऱ्यांची ऊपस्थिती होती.

आपल्या परीवारातील लहान थोरांच्या वाढदिवसाच्या तसेच आपल्या व्यापाराच्या जाहीरातीसाठी व बातम्यासाठी सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752  


No comments:

Post a Comment