कोरोनाविरूध्दच्या लढाईतही मनपा / न.प.कडून भेदभावाचा खेळ... ; निर्जंतुकीकरणासह पत्रे ठोकण्यातही दूजाभाव...
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भाव विरूध्दच्या शासकीय यंत्रणांसह सर्वसामान्य नागरिकसुध्दा अक्षरशः हतबल असताना जिल्हा रुग्णालया पाठोपाठ महापालिका प्रशासन आसो कि नगर परीषद प्रशासन या आपत्कालीन स्थितीतही आपापले रंगरूप दाखवण्यास सुरवात केली आहे.
त्याचे ताजे उदाहरण म्हणजे त्या-त्या प्रभागात कोरोना बाधित व्यक्तींच्या घर व परिसराच्या निर्जंतुकीकरणासह टीनपत्रे ठोकून सील करण्यातही खुलेआमपणे भेदभाव सुरू केला आहे. कोरोनाबाधित बड्या व्यक्ती व कुटूंबियांच्या घरांवर मेहेरनजर करीत दुर्लक्ष केले जात असून `कॉमनमॅन`ला मात्र पूर्णतः टार्गेट करीत कोरोनामुक्त होऊन परतल्या नंतर सुध्दा घर सील करण्याचे अजब आणि धक्कादायक प्रकार सुरूच ठेवले आहेत.
शहराच्या मध्यवस्तीसह चोहूबाजुंच्या वसाहतीत तासा गणीक मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित व्यक्ती आढळत आहेत. झोपडपट्टींसह गल्लीबोळ तसेच उच्चभ्रु वसाहतीं मधुन सुध्दा बड्या हस्ती, त्यांचे आख्खे कुटूंबिय सुध्दा कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळेच सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासकीय यंत्रणेबरोबर नागरिकसुध्दा गेल्या दोन-अडीच महिन्यापासून अक्षरशः अस्वस्थ आहेत. त्यातच कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. त्यामुळे नागरिक भयभित आहेत.अशा या आपत्तीत अन्य यंत्रणांप्रमाणे मनपा प्रशासनानेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे नितांत गरजेचे आहे. त्यादृष्टीने मनपाच्या यंत्रणा उशीरा का होईना, या कोरोनाविरूध्दच्या लढाईत सक्रीय झाल्या आहेत. परंतु नेहमीप्रमाणे काही अधिकारी - कर्मचार्यांनी आपल्यातील `सुप्त गुण` कार्यपध्दतीतुन प्रकट करण्यास सुरवात केली आहे. सरकारी खाक्याप्रमाणे उदासीनता, थातुरमातूर कामे, असमन्वय, कामचोरवृत्ती, जबाबदारी झटकण्यासह अन्य अंगभूत कौशल्य या ना त्या न निमित्ताने प्रगट केले आहेत.
महापालिकेअंतर्गत त्या-त्या प्रभाग क्षेत्रातील काही पथकातील अधिकार्यांच्या एकेक तर्हा किस्सा ठरू लागल्या आहेत.त्याचे एक क्षुल्लक पण गंभीर असे उदाहरण म्हणजे महापालिका क्षेत्रात सर्व सामान्य व्यक्ती बाधित आढळल्या पाठोपाठ अग्नीशामदलाचा बंब त्या स्थळी धावुन निर्जंतुकीकरणाचे काम करत आहे.तसेच कंत्राटी एजन्सी टीनपत्रे ठोकून तो भाग सीलसुध्दा करतो आहे. लगेच त्याचा व्हीडीओ, फोटो काढून अव्वाकी सव्वा रकमेची बीले उकळण्यापर्यंतची इमाने इदबारे सुरू आहेत. हे करते वेळी राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील `वजनदार` व्यक्ती किंवा त्यांच्या कुटूंबातील सदस्य कोरोना बाधित आढळल्यानंतर मनपाच्या पथकांद्वारे विशेष सावधगिरी बाळगुन त्या गोष्टीची फारशी वाच्यता व बोंबाबोंब होऊ नये, म्हणून कटाक्षाने प्रयत्न केले जात आहेत. त्यात त्या बाधित व्यक्तीच्या घरादाराचे निर्जंतुकीकरणाचे काम मध्यरात्री वा भलेपहाटे उरकून घेतले जात आहे. त्या-त्या भागातील नागरिकांना त्याचा मागमुसही लागू नये, याची काळजी घेतल्या जात आहे. त्या बाधित कुटूंबियांच्या घरांना पत्रे ठोकून सील करण्याचे व दर्शनी भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बॅनर लावून आसपासच्या नागरिकांना सतर्क करण्याचे काम मात्र, पद्धतशीरपणे टाळल्या जात आहे. प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील मंडळींची विशेष दखल घेतली जात असताना `कॉमनमॅन`ला मात्र, नियमावली दाखवुन `टार्गेट` केल्या जात आहे.
No comments:
Post a Comment