Tuesday, September 1, 2020

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर
 

 परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवार दि.31 ऑगस्ट 2020 रोजी वर्धापकाळाने दु:खद  निधन झाले आहे. त्यामुळे भारत सरकारच्यावतीने दि.31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2020 या सात दिवसाच्या कालावधीत राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ज्या शासकीय कार्यालयावर दररोज राष्ट्रध्वज लावण्यात येतो तेथे राष्ट्रध्वज अर्ध्यावर उभारण्यात यावा तसेच या कालावधीत कुठलेही कार्यालयीन करमणूकीचे समारंभ अथवा कार्यक्रम घेण्यात येवू नयेत. असे परभणीच्या अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी श्रीमती स्वाती सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a Comment