परभणी जिल्ह्यात लोकडाऊन लावण्यात येणार नाही - पालकमंत्री नवाब मलिक
कोरोनासंदर्भात गाईडलाईनचे कठोरपणे पालन करावे
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
गेल्या काही दिवसापासून परभणी जिल्ह्यात लोकडाऊन, संचारबंदी ,जनता कर्फ्यू लागणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फीरत आहेत त्यामुळे जनतेत विविध चर्चाना उधाण आले आहे. नेमके काय होणार याबात व्यापारी जनतेमध्ये चर्चा आहे .
परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना परभणी जिल्ह्यात येणाऱ्या काळात संचारबंदी लोकडाऊन लावण्यात येणार आहे काय असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना मलिक म्हणाले परभणी जिल्ह्यात लोकडाऊन लावण्यात येणार नाही पण जनतेने सोशल डिस्टंसिंग , तोंडाला मास्क,व कोरोनासंदर्भात देण्यात आलेल्या गाईडलाईन चे कठोरपणे पालन करावे ज्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येइल पालकमंत्री नवाब मलिक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते .
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा तपशील व प्रशाषनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामाची माहीत दिली . तसेच जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबादारी या मोहिमेबाबत माहिती दिली कोरोना संदर्भात जनतेमध्ये जनजागृती होण्यासाठी लोककलावंताच्या मार्फत पारंपरिक कलेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले . पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री म्हणाले जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी ५० बेड चे जंबो रुग्णालय उभारण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यात ऑक्सीजन ची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
No comments:
Post a Comment