Monday, September 7, 2020

70: 30 चे सूत्र रद्द! यापुढे 'वन महाराष्ट्र वन मेरीट' ; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

70: 30 चे सूत्र रद्द! यापुढे 'वन महाराष्ट्र वन मेरीट' ; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

यापुढे वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश 70: 30 या सूत्रानुसार होणार नाही. हे सूत्र रद्द करण्यात आले आहे. नीट परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारेच वैद्यकीय प्रवेश निश्चित केले जातील अशी घोषणा आज  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केली. आपल्या विवेचनाचा समारोप करताना 'वन महाराष्ट्र वन मेरिट' असेही ते म्हणाले.
     वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रियेत 70: 30 या सुत्रामुळे मराठवाड्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी वंचित राहत होते. या सूत्रानुसार होणारी प्रवेश प्रक्रिया यापुढे रद्द करण्याचा अधिनियम आपण काढत आहोत. केवळ नीट परीक्षेतील गुणवत्तेनुसार आता वैद्यकीय प्रवेश होतील. असेही आपल्या निवेदनादरम्यान अमित देशमुख यांनी सांगितले. यासंदर्भातील घोषणा करताना त्यांनी सर्व संबंधितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment