अखिल भारतीय ग्राहक पंचायतची परभणी तालुका कार्यकारीणी जाहीर अध्यक्षपदी अब्दुल रहीम
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुक्याची कार्यकारीणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रान्त उपाध्यक्ष तथा परभणी जिल्हाध्यक्ष डॉ.विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी तालुका कार्यकरणीत फेरबदल करून नवीन पदाधिकारी मध्ये अध्यक्ष : अब्दुल रहीम , उपाध्यक्ष : विजय सोपानराव चट्टे , उपाध्यक्ष : गोपाळ कच्छवे, संघटक : सुधाकर शिंदे , सचिव : सय्यद रफिक पेङगावकर , सहसचिव : योगीराज वाकुडे , कोषाध्यक्ष : चंद्रकांत घाडगे , सह कोषाध्यक्ष : मुजीब खान , तर सदस्य : लक्ष्मण उद्धवराव पवार , बाबासाहेब भोसले , ऋषी फुलारी , मौला हरबेलकर आणि मार्गदर्शक : भानुदास मामा शिंदे तसेच 2 महिला सदस्य पूजा भुसारे , गोदावरी गणेशराव कऱ्हाळे.या पदाधिकार यांची फेरनिवड करण्यात आली.यावेळी डॉ विलास मोरे यांनी आपले विचार मांडले की , दिवसेंदिवस वाढत्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांना घटनेने दिलेले अधिकार राजरोसपणे पायदळी तुडवले जात आहेत.सामान्य माणूस या भ्रष्टाचारामुळे जेरीस आलेला आहे.वाढत्या महागाईमुळे त्यांना आपले जीवन जगणे अशक्य होत चालले आहे. प्रशासन कडुन विविध योजना रॉकेल , रेशनिंग , गॅस यासारख्या जीवनाश्यक गरजेच्या वस्तू नागरिकांपर्यंत पोहोचणे दुरापास्त झाले आहे . शासकीय योजनांना भ्रष्टाचाराची गळती झाल्याने नागरिकांपर्यंत एक रुपयातील पंधरा पैसे जाईनासे झालेले आहे . भ्रष्टाचाराच्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की , वरील प्रश्न हाताशी घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे आपणासारखे ध्येयवादी कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकांना मदतीचे कार्य करीत आले आहे . तसेच केलेल्या कार्य अहवालानुसार आपला फेरविचार करून आपली परभणी तालुका सर्व पदीची निवड करण्यात आली आहे . अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ध्येय धोरणानुसार कार्य अपेक्षित असून आपणास पुढील कार्यासाठी नविन फेरनिवङ पदाधिकार्यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आले . यावेळी अ.भा.ग्रा.प.चे जिल्हाध्यक्ष डॉ . विलास मोरे , जिल्हा संघटक धाराजी भुसारे , जिल्हा सचिव डॉ. संदीप चव्हाण जिल्हा सदस्य के.बी. शिंदे , कमलाताई राठोड , अनिल दहिवाळ आदि . पदाधिकारी - कार्यकर्तेची उपस्थिती होती .

No comments:
Post a Comment