Wednesday, September 30, 2020

प्रा.गोविंद लहाने यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर

प्रा.गोविंद लहाने यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार जाहीर 


सोनपेठ (दर्शन)

सोनपेठ येथील दै.सोमेश्वर साथीचे तालुका प्रतिनिधी व श्री.महालींगेश्र्वर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.गोविंद त्रिंबकराव लहाने यांची, एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे.
 
               प्रा.गोविंद लहाने हे सोनपेठ येथील श्री महालिंगेश्र्वर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असून ते आपल्या शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही नेहमी सहभागी असतात. ते विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवित असतात तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात नेहमी शैक्षणिक व सामाजिक जनजागृती करत असतात. प्रा. गोविंद लहाने हे शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक नावलौकिक व्यक्तिमत्व असून विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत तर सामाजिक कार्यात ते नेहमी सक्रिय असतात आजपर्यंत त्यांनी सोनपेठ व परिसरातील अनेक गावात विविध उपक्रम राबविले आहेत ( स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, पर्यावरण जनजागृती, कलामहोत्सव,गुणगौरव कार्यक्रम ) तर ते एक प्रसिद्ध कवी आहेत. काव्य लेखन व एकांकिका लेखनही करतात. त्यांच्या अनेक कविता प्रातिनिधिक कविता संग्रहातून प्रकाशित झाल्या आहेत तर त्यांचा "दुहिता" हा चारोळी कविता संग्रह प्रसिद्ध कवी फ.मु.शिंदे
यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. तर त्यांना आतापर्यंत महात्मा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, कविरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब सोनपेठ आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत तर त्यांनी २०१८-१९ ला भूतान पर्यावरण अभ्यास दौरा यशस्वी केला.त्यांच्या या कार्यावरून एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र, यांनी राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड केली असून हा पुरस्कार २ ऑक्टोबर २०२० शुक्रवार रोजी सांस्कृतिक सभागृह ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथील कार्यक्रमात मा.खासदार डॉ.फौजिया खान व सिने.अभिनेता मा.अनिल मोरे यांच्या हस्ते आणि माजी खा. गणेशराव दुधगावकर यांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे.राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल प्रा.गोविंद लहाने यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

Sunday, September 27, 2020

जिल्हाधिकारी मुगळीकर यांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा

जिल्हाधिकारी मुगळीकर यांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा

                       

पालम / सोनपेठ (दर्शन) :-

पालम तालुक्यत गेल्या दहा दिवसापूसन होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील हजारो शेतकर्‍यांच्या पिकांची नासाडी झाली असून या आस्मानी संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. या शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी आमदार डा. रत्नाकर गुट्टे प्रयत्नशील असून आज जिल्हाधिाकरी दिपक मुगळीकर यांनी पालम तलाुक्याचा पाहणी दोरा केला. प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जात पाहणी केल्यानं शेतकर्‍यांच्या व्यथा जिल्हाधिकार्‍यांच्या समोर आल्यात. रावराजुर येथे काही शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं वाहनं जात नव्हती त्या ठिकाणी चक्क जिल्हाधिकार्‍यांना बेलगाडीत बसवून आमदार गुट्टे घेवून गेले आणि पाहणी केली यामुळे आमदार गुट्टे यांनी जिल्हाधिकार्‍यांना बेलगाडीचा प्रवास घडविल्याचे दिसून आले.गेल्या दहा दिवसापासून परिसरात आसलेल्या मुसळधार पावसामुळे पालम तालुक्यातल्या अनेक गावांना फटका बसला आहे. तर नदी नाल्यांना आलेल्या पुरानेही शेतकर्‍यांची पिके वाहून गेली आहेत. यामध्ये कापूस, सोयाबीन व उस या पिकांची मोठी नासाडी झाली आहे. या शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डा. रत्नाकर गुट्टे यांनी प्रशासनासोबतच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडेही केली. राज्यस्तरावरून पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी पालम तलाुक्यातील रावराजुर, रोकडेवाडी,केरवाडी, पालम आदी गावातील नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी दोरा केला.या दौर्‍यात त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार ज्योती चव्हाण,जिल्हा अध्यक्ष अँड संदीप अळनुरे,पालम पुर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष असदख पठाण,नगरसेवक संजय थिटे,शेख गौस,शिवराम पैके, चंद्रकांत गायकवाड राहुल शिंदे बाळासाहेब फूलपगार ,नारायण झिलेवाडआदींसह पदाधिकारी उपस्थित हेाते. जिल्हाधिाकरी यांनी पालम तलाुक्याल्या रावराजुर, रोकडेवाडी, केरवाडी व पालम या गावच्या शेतकर्‍यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. विशेष म्हणजे रावराजूर या गावातील शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी वाहन जात नसल्यानं आमदार गुट्टे यांनी बेलागाडी मागवून जिल्हाधिकार्‍यांना प्रत्यक्ष शेतर्‍यांच्या बांधावर नेले. या दोर्‍यात रासप व आमदार गुट्टे मित्रमंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित हेाते.


सा.सोनपेठ दर्शन बातम्या व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी.मो.9823547752 .

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम आरोग्याची चळवळ व्हावी - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे




औरंगाबाद / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

कोरोनावर मात करण्यासाठी  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम प्रभावीपणे राबवावी. या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.  ही मोहिम आरोग्याची  चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले. ज्याप्रमाणे केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षरतेचे राज्य म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणे आपला महाराष्ट्र हे आरोग्य साक्षरतेत सर्वात पुढे राहील, असे प्रयत्न करायचे आहेत. स्वतःची काळजी घेतानाच इतरांची कशी काळजी घ्यायची. गर्दीच्या ठिकाणी कसे वर्तन करायचे या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोहचवायच्या आहेत, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज मराठवाडा विभागातील आठ जिल्हयांशी दृकश्राव्य प्रणालीव्दारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी   उदयोग मंत्री तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री  अशोक चव्हाण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे, वैदयकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री तथा बीड जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंढे सहभागी झाले होते.
तर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक एम.के. प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शासकीय वैदयकीय महाविदयालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाचे संरक्षण हा  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’या मोहिमेचा उदेदश आहे. ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल, असा विश्वास वाटतो आहे. मराठवाड्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. आरटी-पीसीआर टेस्टची संख्या वाढविणे आवश्यक आहे. ज्यांची अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आली असेल, आणि लक्षण असतील त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट होणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटनसारख्या देशात आता लक्षणे न दिसणाऱ्या पण पॉझिटीव्ह रुग्णांना घरीच उपचार दिले जात आहेत. पण त्यांची दररोज चौकशी केली जाते. त्यांना त्रास होऊ लागल्यास रुग्णालयात दाखल केले जात आहे. आपल्याकडे होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन यांची गल्लत केली जात आहे. होम क्वारंटाईन केलेल्यांना आपण घरी जाऊ देतो. पण लक्षणे न दिसणारी अशी मंडळी बाहेर फिरू लागतात आणि त्यांच्यामुळे अन्य काहींपर्यंत विषाणू पोहचू लागला आहे.
दरम्यान,  जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जाऊ लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे.
ब्रिटन आणि अन्य देशात आता पुन्हा बंधने घालणे सुरु करण्यात आले आहे. रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजले जात आहेत. पुढचे सहा महिने ही बंधने राहतील अशी शक्यताही आहे. त्यामुळे आपल्याकडे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. या मोहिमचा उद्देश स्वरक्षणाचा आहे. मी सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हा या मोहिमेचा गाभा आहे. त्यामुळे आता आपल्याला जनजागृती आणि ट्रेसिंग- टेस्टिंगवर भर द्यावा लागणार आहे. डॉक्टरला रुग्ण वेळेत मिळणे आणि रुग्णाला डॉक्टर सोबतच औषधे मिळणे यांची सांगड घालावी लागणार आहे. औषधं उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण त्यांचा वापर करण्याचा निर्णय आणि जबाबदारी ही डॉक्टरांची आहे. त्यासाठी आपण उपचार पद्धतीसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार केल्या आहेत. कुणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरित्या औषधांचा वापर होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषतः कोरोना होऊन गेल्यानंतरच्या उपचारातही काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण आरोग्य विभागाचा टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सने निसंकोचपणे राज्यस्तरावरील टास्क फोर्सशी संपर्क साधावा. यातून राज्यातील मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी करता येतील, ते सर्व प्रय़त्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
राज्यात ऑक्सिजनची उपलब्धता आणि त्याच्या वाहतूकीबाबत केंद्र सरकारशी संपर्क साधला आहे. तसेच औषधांच्या उपलब्धतेसाठी राज्यस्तरावरून केंद्रीय पद्धतीने समन्वयन सुरु असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपली ही माझी कुटुंब माझी जबाबदारी मोहिम देशातील नव्हे, जगातील आरोग्य चळवळ ठरेल, असा विश्वास आहे. यात आपल्याला जनतेचा सहभाग वाढवायचा आहे. प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी आपण यातून घेणार आहोत. लहानपणी आपल्याला आई-वडील बाहेरून आल्यानंतर हात-पाय धुवा, स्वच्छतेची काळजी घ्या अशा सवयी लावत. त्यामुळे आता या सूचना ग्रामीण भागापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. प्रत्येक प्रदेशाची एक खासियत आहे, तिथे वेगवेगळ्या लोककलांची परंपरा आहे. या वेगवेगळ्या शैलींचा वापर करून आपल्याला या गोष्टी लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. लॉकडाऊन हवे की जीवनशैली बदलणे परवडेल हे लोकांना पटवून द्यायला हवे. लॉकडाऊनमुळे जगाचेच अर्थचक्र बिघडले आहे. त्यामुळे हे अर्थकारणाची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जीवन शैलीतील बदल स्विकारावे लागतील. स्वचःची काळजी घेऊन कामांसाठी बाहेर पडावे लागेल. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी नो मास्क नो एन्ट्री हे धोरण राबविणे सुरु केले आहे. मास्क नसेल तर दुकानात प्रवेश नाही. जो दुकानदार मास्क वापरणार नाही, त्याच्याकडूनही खरेदी नाही, अशी भुमिका घेण्याचे लोकांना आवाहन केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर माझे काय होईल, या भितीने काहीजण तपासणीसाठी पुढे येत नाहीत. तर काही मला काही होत नाही म्हणून बेपर्वाईने वागतात. या दोन्हीतून आपल्याला मार्ग काढून विषाणू प्रसार रोखायचा आहे, असे श्री. ठाकरे यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करा – या आधीचे सणवार आपण साधेपणाने साजरे केले आहेत. गणेशोत्सवही आपण साधेपणाने साजरा करण्यात यशस्वी झालो. आता आपल्याला येणारा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करायचा आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील.
दरम्यान, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी  आठही जिल्हयातील जिल्हाधिकांऱ्यांशी  संवाद साधून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’या मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. या मोहिमे अंतर्गत जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. या मोहिमेचा महत्त्वाचा सिम्बॉल जनजागृती करताना वापरण्याची सूचना त्यांनी केली. नांदेडने तयार केलेल्या होम आयसोलेशन किटबददल त्यांनी समाधान व्यक्त केले तर बीड जिल्हयात प्रत्येकाच्या दारावर मोहिमेच्या सिम्बॉलचे स्टीकर लावण्याच्या निणर्याचे कौतुक केले.
औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, औरंगाबाद जिल्हयात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. स्थानिक लोककलावंतांच्या माध्यमातून ही मोहिम तळागाळापर्यंत पोहाचविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जनजागृतीसाठी धर्मगुरु यांचेही सहकार्य घेतले जाईल. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही जिल्हयात मोहिम यशस्वी केली जाईल, असे सांगितले. तसेच ऑक्सिजनच्या पुरवठयातील अडचणी दूर कराव्यात, असे ते म्हणाले. जालना जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जिल्हयात कोरोनाच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घेतली जात आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी लोकांचा प्रतिसाद लाभावा, यासाठी प्रयत्न केला जाईल. लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी मोहिमेचे कौतुक करुन जिल्हयात मोहिम उत्तम प्रकारे राबविण्यात येत असल्याचे सांगितले. 15 ऑक्टोबर नंतर मोहिमेचा विस्तार करुन नाविण्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे ते म्हणाले. परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेसाठी लोकांचे चांगले सहकार्य मिळत आहे. लोकप्रतिनिधीही सहकार्य करत आहे. मोहिमेबददल कुणाचीही तक्रार नाही. ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यात येईल, असे ते म्हणाले. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंढे म्हणाले की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वपक्षीय मेळावा घेण्यात आला. सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत आहे. अतिशय प्रभावीपणे जिल्हयात मोहिम राबविण्यात येत आहे.
यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, बीडचे  जिल्हाधिकारी राहूल रेखावार, उस्मानाबादचे‍ जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आपआपल्या जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती दिली.

Saturday, September 26, 2020

भाजपा राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील नेते मंडळींना परभणी भाजपा ग्रामिण च्या वतिने शुभेच्छा !

भाजपा राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील नेते मंडळींना परभणी भाजपा ग्रामिण च्या वतिने शुभेच्छा !




सोनपेठ (दर्शन) :-

परभणी भाजपा ग्रामिण च्या वतिने जिल्हा अध्यक्ष डाँ.सुभाष कदम व जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जे.पी.नड्डाजी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कार्यकारिणी दि.26 सप्टेंबर 2020 शनिवार रोजी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सह महासचिव म्हणून जबाबदारी मिळाल्याबद्दल परभणी चे भुमिपुत्र मा.श्री.व्ही.सतीशजी तसेच राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी मिळाल्याबद्दल मा.श्री.विनोदजी तावडे, मा.सौ.पंकजाताई मुंडे पालवे, मा.श्री.सुनीलजी देवधर व मा.सौ.विजयाताई रहाटकर तसेच भाजप अल्पसंख्याक मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जमालजी सिद्दीकी, राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल खासदार मा.सौ.हिनाताई गावित यांच्यासह पक्ष संघटनेत महत्वाच्या जबाबदारी मिळालेल्या सर्व नेते मंडळीचे परभणी भाजपा ग्रामिण च्या वतिने जिल्हा अध्यक्ष डाँ.सुभाष कदम व जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन



सोनपेठ (दर्शन) :-

देशात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रक्ताच्या तुटवड्यामुळे येत्या २८ सप्टेंबर २०२० रोजी शहीद भगतसिंग जयंती निमित्त शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनच्या वतीने येथील शहीद भगतसिंग चौक परळी वैजनाथ रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या भव्य रक्तदन शिबिरात रक्तदात्यांसह तालुक्यातील नागरिकांनी सहभाग नोदवून रक्तदान करून देशाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून रक्तदान करावे असे आवाहन शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार सतप्रितसिंघ रघबीरसिघ शाहू यांनी केले आहे.




सा.सोनपेठ दर्शन जाहीरातीसाठि व बातम्या साठी संपर्क संपादक किरण रमेश स्वामी.मो.9823547752.

कृषिमंत्र्यांचा रविवारी परभणीत धावता दौरा...

कृषिमंत्र्यांचा रविवारी परभणीत धावता दौरा...



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
 
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे हे रविवारी (दि.27) सकाळी साडेनऊ वाजता परभणीत दाखल होणार असून ते पावसासह पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच नुकसानीचा व कृषी विषयक योजनांचाही एका बैठकीद्वारे आढावा घेणार आहेत. श्री. भिसे हे सकाळी साडेनऊ वाजता हिंगोलीहून परभणीत दाखल होणार असून सकाळी 11 वाजता पानगावमार्गे ते लातूरकडे रवाना होणार आहेत.

Friday, September 25, 2020

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांचे दिनदयाळजी उपाध्याय यांना अभिवादन

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांचे दिनदयाळजी उपाध्याय यांना अभिवादन




सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका येथे स्वर्गीय दिनदयाळजी उपाध्याय यांच्या जन्म जयंती अनुषंगाने दिनदयाळजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन तसेच घरावर भाजपाचा ध्वज फडकावत असताना परभणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, ज्ञानेश्वर मव्हाळे व राजकुमार मव्हाळे आदिजन दिसत आहेत.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांचे दिनदयालजी उपाध्याय यांना अभिवादन

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांचे दिनदयालजी उपाध्याय यांना अभिवादन 



सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका येथे स्वर्गीय दिनदयालजी उपाध्याय यांच्या जन्म जयंती अनुषंगाने दिनदयालजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन तसेच घरावर भाजपाचा ध्वज फडकावत असताना परभणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे, ज्ञानेश्वर मव्हाळे व राजकुमार मव्हाळे आदिजन दिसत आहेत.

Thursday, September 24, 2020

जिल्ह्यात 685 रुग्णांवर उपचार सुरू, 111 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 685 रुग्णांवर उपचार सुरू, 111 रुग्णांची वाढ


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जिल्ह्यातील 111 रुग्णांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4991 एवढी झाली आहे. त्यापैकी 4096 बरे झाले तर 210 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 685 जणांवर उपचार सुरु आहेत.
गुरुवार दि.24 सप्टेंबर 2020 रोजी एकुण 116 कोरोनाबाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यात एकुण 1 हजार 765 बेड उपलब्ध आहेत यापैकी ॲक्टीव्ह बेड 685 असून रिक्त बेडची संख्या 1 हजार 80 अशी आहे. असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

सोनपेठ तालुका महावितरण विभागाचे प्रश्न सोडविण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


सोनपेठ तालुका महावितरण विभागाचे प्रश्न सोडविण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन



सोनपेठ (दर्शन) :-

सोनपेठ येथील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य किरण रमेश स्वामी यांनी दि.24 सप्टेंबर 2020 गुरुवार रोजी एका निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी यांना जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक बोलावणे तसेच सोनपेठ तालुका महावितरण विभागाचे प्रश्न सोडवणे बाबत सविस्तर निवेदन देऊन, निवेदनात covid-19 त्या धर्तीवर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.त्यातच सोनपेठ तालुक्यातील तमाम वीज ग्राहकांना लाँकडाउन च्या काळात अव्वा च्या सव्वा विज बिले तसेच व्याज लाऊन बिले देण्यात आली.हे सर्व बिले दुरुस्ती करून देण्यात यावी तसेच लाँकडाउन च्या काळातील विज बिलास लावलेले व्याज माफ करण्यात यावे.ज्या ग्राहकांनी वीज बिले भरली आहेत,त्यांना दुरुस्ती केल्यानंतर
त्यांच्यापुढील बिलास समायोजन करून घेण्यात यावे तसेच मे.साहेबांनी लवकरात लवकर सोनपेठ तालुक्यात महावितरण विभागाकडून दुरुस्ती समिती प्रश्न सोडविण्याकरिता आपण अधीक्षक अभियंता यांना आदेशित करून महावितरण'कडून जनतेची होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी विनंती केली आहे या निवेदनाची एक प्रत माननीय अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी परभणी यांना ही देण्यात आलेली आहे.






Tuesday, September 22, 2020

आनंदाची बातमी :पहाटे पासुन वाण धरण ओव्हरफ्लो......

आनंदाची बातमी :पहाटे पासुन वाण धरण ओव्हरफ्लो......



परळी / सोनपेठ (दर्शन) :-
 
परळी शहरासह पंधरा गावांना पाणीपुरवठा करणारे नागापुर येथील वाण धरण आज दि.23 रोजी पहाटे ओसंडुन वाहू लागले आहे.तब्बल चार वर्षानंतर वाण प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पाणी पडत आहे.
नागापुर येथील वाण धरणात यावर्षी चांगल्या पावसामुळे सुरुवातीपासून पाणीसाठा समाधानकारक होता परंतु धरण भरण्याची प्रतिक्षा होती. सन 2016 नंतर हे धरण आज दि.23 सप्टेंबर रोजी पहाटे ओसंडुन वाहू लागले आहे.यामुळे परळी शहरासह पंधरा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असुन शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

खा.फौजीया खान अन्नत्याग करणार..

खा.फौजीया खान अन्नत्याग करणार..

mp faujiya khan news




परभणी / सोनपेठ (दर्शन)  :- 

लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेले कृषी विधेयक आणि त्या विरोधात संसद परिसरात विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाला आता मोठा पाठिंबा मिळतांना दिसतो आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपण देखील आंदोलकांसोबत एक दिवस अन्नत्याग करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता त्यांच्या पक्षाच्या राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी देखील अन्नत्याग करत या आंदोलनात सहभागी होत असल्याचे सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना सांगितले.कृषी विधेयकला विरोध करत राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या कॉंग्रेससह अन्य पक्षाच्या आठ खासदारांना उपसभापतीने सात दिवसांसाठी निलंबित केले होते. या कारवाई आणि कृषी विधेयकांच्या विरोधात या सर्व खासदारांनी संसद परिसरातील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळच उपोषण सुरू केले. याचे पडसाद आजही संसदेत उमटले आणि खासदारांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळायला सुरूवात झाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. उपोषणाला बसलेल्या खासदारांना पांठिबा दर्शवत शरद पवार यांनी देखील आपण एक दिवस अन्नत्याग करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते.

शरद पवार यांच्यानंतर त्यांच्या पक्षाचे इतर खासदार देखील या आंदोलनात सहभागी होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात खासदार फौजिया खान यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, आमचे नेते शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय ते एक दिवस अन्नत्याग करत कृषी विधेयकाच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या सदस्यांच्या आंदोलनात देखील सहभागी होत आहेत. मी देखील सभात्याग करून बाहेर पडले असून अन्नत्याग आंदोलन करणार आहे.

कृषी सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मतदानासाठी ठेवले तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने वॉकआऊट केले होते. राष्ट्रवादीच्या या कृतीवर अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादीने एकप्रकारे विधेयकाला पाठिंबाच दिला असा आरोप देखील केला गेला.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय कुणीही कृषी विधेयक व पक्षाच्या भूमिके बद्दल अधिक भाष्य केले नव्हते. परंतु आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विधेयक आणि त्यावरून देशाच्या काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या आंदोलन व सदस्यांच्या निलंबनाच्या कारवाईवर आपली सविस्तर भूमिका मांडली. शिवाय अन्नत्याग करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही जाहीर केले.


सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.
 

Monday, September 21, 2020

अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाच्या वतीने महानगरपालिकांच्या कोरोना योद्धांचे सत्कार

अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाच्या वतीने महानगरपालिकांच्या कोरोना योद्धांचे सत्कार 



परभणी / सोनपेठ (दर्शन): -

कोरोना काळात शहर महानगरपालिकेचे काम करणारे विविध क्षेत्रातील अधिकारी , कर्मचारी यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष अब्दुल रहीम यांच्या वतीने सत्कार करण्यात आले . परभणील शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता समाजावर जे संकट निर्माण झाले आहे , त्या संकटांना सामोरे जाऊन जे खरी समस्या सोडवतात तेच खरे ' कोरोना योद्धा ' असतात . कोरोना काळात सहकार्य करणाऱ्या परभणी शहर महानगरपालिकाचे स्वच्छता विभागाचे अधिकारी , कामाटी , कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्याचे काम केलेले आहे . या कोरोना योद्धांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी मनपाच्या स्वच्छता विभागाचे मुखतसीद खान ( नोडल अधिकारी ) , अब्दुल शादाब ( स्वच्छता निरीक्षक ) , दिपक कानोडे ( प्रभावी अग्निशामक दल अधिकारी ) , कर्मचारी गणेश गायकवाड , अहमद भाई , सामाजिक कार्यकर्ते ईश्वरलाल , बालाजी काकडे , रशीद भाई , प्रफुल पैठणे , लक्ष्मणराव जोगदंड , गौतम वावळे तसेच या क्षेत्रातील अनेक कामाटीतसेच, श्री स्वामी समर्थ शिवाजीनगर येथील जे सेवेकरी आहेत व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक धाराजी भुसारे , जिल्हा सदस्य के.बी.शिंदे , तालुका अध्यक्ष अब्दुल रहिम , तालुका सचिव सय्यद रफिक पेडगावकर , योगिराज वाकुडे , विजय सोपानराव चट्टे , बाबासाहेब भोसले , मुशरफ खान आदींची उपस्थिती होती . 

सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.

अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाच्या वतीने महानगरपालिकांच्या कोरोना योद्धांचे सत्कार

अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाच्या वतीने महानगरपालिकांच्या कोरोना योद्धांचे सत्कार 



परभणी / सोनपेठ (दर्शन): -

कोरोना काळात शहर महानगरपालिकेचे काम करणारे विविध क्षेत्रातील अधिकारी , कर्मचारी यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष अब्दुल रहीम यांच्या वतीने सत्कार करण्यात आले . परभणील शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता समाजावर जे संकट निर्माण झाले आहे , त्या संकटांना सामोरे जाऊन जे खरी समस्या सोडवतात तेच खरे ' कोरोना योद्धा ' असतात . कोरोना काळात सहकार्य करणाऱ्या परभणी शहर महानगरपालिकाचे स्वच्छता विभागाचे अधिकारी , कामाटी , कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्याचे काम केलेले आहे . या कोरोना योद्धांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुक्याच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी मनपाच्या स्वच्छता विभागाचे मुखतसीद खान ( नोडल अधिकारी ) , अब्दुल शादाब ( स्वच्छता निरीक्षक ) , दिपक कानोडे ( प्रभावी अग्निशामक दल अधिकारी ) , कर्मचारी गणेश गायकवाड , अहमद भाई , सामाजिक कार्यकर्ते ईश्वरलाल , बालाजी काकडे , रशीद भाई , प्रफुल पैठणे , लक्ष्मणराव जोगदंड , गौतम वावळे तसेच या क्षेत्रातील अनेक कामाटीतसेच, श्री स्वामी समर्थ शिवाजीनगर येथील जे सेवेकरी आहेत व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक धाराजी भुसारे , जिल्हा सदस्य के.बी.शिंदे , तालुका अध्यक्ष अब्दुल रहिम , तालुका सचिव सय्यद रफिक पेडगावकर , योगिराज वाकुडे , विजय सोपानराव चट्टे , बाबासाहेब भोसले , मुशरफ खान आदींची उपस्थिती होती . 


खा. सातव यांच्या वाढदिवसानिमित गंगाखेडला कोरोना योद्ध्यांचा गौरव

खा. सातव यांच्या वाढदिवसानिमित गंगाखेडला कोरोना योद्ध्यांचा गौरव



गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) :-

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते, खासदार ॲड राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेड येथे कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. तालुका कॉंग्रेसच्या वतीने गोविंद यादव यांनी  या  ऊपक्रमाचे आयोजन केले होते. तहसीलदार स्वरूप कंकाळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 
आपल्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत आणि कोरोना योद्ध्यांचा गौरव असे सामाजीक ऊपक्रम राबवण्याचे आवाहन खा. सातव यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत गंगाखेड तालुका कॉॅंग्रेस  कमिटीच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. गंगाखेड येथील आयटीआय सेंटर येथील कोविड तपासणी केंद्रातील प्रमुख तपासणीस प्रविण जायभाये यांचा फेटा बांधुन तर डॉ. योगेश मलुलवार, डॉ. वसिम शेख, मनोज नाव्हेकर, राजकुमार फड, संतोष मुंडे, ज्ञानेश्वर गुट्टे, अतुल तुपकर यांचा शाल - श्रीफळ आणि पुष्पहार देवून गौरव करण्यात आला. तसेच कस्तुरबा गांधी शाळेतील कोविड विलीगीकरण केंद्रातील डॉ. कांचन कांगणे, ईंचार्ज तक्षशीला वाघमारे, अश्विनी प्रधान, सुमेधा नागरगोजे, शफी शेख, खाजा शेख, बापु चव्हाण, एमपीडब्ल्यू वाघमारे आदिंचा पुष्पहारांनी सन्मान करण्यात आला. कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, त्यांचे सर्व सहकारी, नगर परिषद कर्मचारी आणि विविध कोरोना योद्ध्यांप्रती तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. युवा नेते सुशांत चौधरी, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रणित खजे, विधानसभा सचिव, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव आदी या प्रसंगी ऊपस्थित होते. शुभम भिसे, अजय कुकाले, प्रदिप चौधरी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.
सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क संपादक किरण रमेश स्वामी मो.9823547752.

अखिल महाराष्ट्र शिवाचार्य संघटनेच्या वतीने वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज व श्री गुरू बसवलिंग शिवाचार्य महाराज हदगाव यांना श्रध्दांजली वाहीली झुम मिटींग व्दारे राज्यभरातील तमाम शिवाचार्यांनी दिली मानवंदना

अखिल महाराष्ट्र शिवाचार्य संघटनेच्या वतीने वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज व श्री गुरू बसवलिंग शिवाचार्य महाराज हदगाव यांना श्रध्दांजली वाहीली झुम मिटींग व्दारे राज्यभरातील तमाम शिवाचार्यांनी दिली मानवंदना


बिड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

तमाम वीरशैव लिंगायत समाजाचे वंदनीय गुरू वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे शिवऐक्य झाले त्यांच्या जान्याने वीरशैव लिंगायत समाजाचे भरून न येनारे नुकसान झाले आहे.डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज हे दैवी पुरूष होते आपले आयुष्य चंदनासारखे झिजवून समाजाला समतेचा,शांतीचा उपदेश दिला व संघटीत राहन्याची शिकवन वंदनीय अंप्पानी दिली आहे.
देशभरात सर्वत्र अप्पांना श्रध्दांजली समर्पीत केली जात आहे.

समस्त शिवाचार्य यांच्या  संघटनेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियमाचे पालन करून
दिनांक: 20 सप्टेंबर 2020 रविवार रोजी झुम मिटींग प्रणालीचा अवलंब करत भावपुर्ण श्रध्दांजली वाहीली.या वेळी संघटनेचे अध्यक्ष ष.ब्र.श्री १०८ डॉ.विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथधाम यांनी अप्पा विषयी आपले दुख:द मनोगत व्यक्त करताना भावना अनावर झाल्या होत्या प.पु.अप्पांनी आपले संपुर्ण जीवन हे समाज संघटनेसाठी समाज प्रबोधनासाठी धर्म जागृती करून चंदनरूपी देह झिजवला आहे.अप्पांचे कार्य हे शब्दात व्यक्त करता येने अश्यक्य आहे. कपिलधार पदयात्रेच्या माध्यमातुन असो वा श्रावणमास अनुष्ठान सांगता कार्यक्रम विविध धर्मकार्यातुन लाखो भक्तांना संघटीत केले.त्यांच्या पश्चात आम्ही सर्वच हतबल आहोत असे शिवाचार्य संघटनेच्या अध्यक्षांनी आपली भावना व्यक्त केली.

संघटनेचे सचिव ष.ब्र.श्री १०८ महादेव शिवाचार्य महाराज यांनी आपले भावनीक मनोगत व्यक्त करताना प.पु.अप्पांच्या आठवनी व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना संत शिरोमनी मन्मथ स्वामी यांचे नंतर साडेचारशे वर्षानंतर परमरहस्य ग्रंथाला सर्व समाजा पर्यंत पोहचवीन्याचे महान कार्य डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.प्रती मन्मथ स्वामीचा अवतारच होते अप्पा, निश्वार्थ परमार्थाचा मार्ग दाखवीनारे दैवी पुरूष पुन्हा होने नाही असे मनोगत व्यक्त केले.
झुम मिटींगच्या माध्यमातुन श्रध्दांजली समर्पीत करण्यासाठी सोलापुरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी,म्हाडेकर शिवाचार्य महाराज,वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत,श्री गुरू काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी,राचलिंग शिवाचार्य महाराज परांडकर,गिरगावकर शिवाचार्य यांनी देखील श्रध्दांजली अर्पण केली व आपले मनोगत व्यक्त केले.

Saturday, September 19, 2020

पंतप्रधान, कृषीमंत्र्यांना पाठवली कांद्याची भेट ! ; गंगाखेड कॉंग्रेसचे अभिनव आंदोलन

पंतप्रधान, कृषीमंत्र्यांना पाठवली कांद्याची भेट ! ; गंगाखेड कॉंग्रेसचे अभिनव आंदोलन 



गंगाखेड / सोनपेठ (दर्शन) : - 

केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर बंदी लादली आहे. ती ऊठवावी या मागणीसाठी आज गंगाखेड तालुका कॉंग्रेसने अभिनव आंदोलन केले. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंताप्रधान आणि कृषीमंत्र्यांना कांदे भेट पाठवाण्यात आली. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने ही बंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी केली. 

मोठ्या प्रमाणात ऊत्पादन झालेल्या कांद्यास चांगला भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातीस बंदी घातली. यामुळे कांद्याचे भाव गडगडले आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. ही बंदी ऊठवावी, अशी मागणी देशभरातून केली जात असताना गंगाखेड तालुका कॉंग्रेसने आज अभिनव आंदोलन केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसींह तोमर यांना गंगाखेड तहसीलदारांमार्फत दोन पीशवी कांदे भेट म्हणून पाठवण्यात आले. केंद्र शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधने हाच या भेटीमागचा ऊद्देश असल्याचे यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी सांगीतले. युवानेते सुशांत चौधरी यांनी ही अयोग्य बंदी तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. नगरसेवक प्रमोद मस्के, युवक कॉॅंग्रेसचे विधानसभा सचीव, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव, शहराध्यक्ष नागेश डमरे, प्रभाकर सातपुते, अजय कुकाले, वसंतराव गेजगे, निवृत्ती केदारे, अर्जुन भोसले आदिंसह शेतकरी, पदाधिकाऱ्यांची ऊपस्थिती होती.

आपल्या परीवारातील लहान थोरांच्या वाढदिवसाच्या तसेच आपल्या व्यापाराच्या जाहीरातीसाठी व बातम्यासाठी सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752  


Friday, September 18, 2020

277 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 283 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

277 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 283 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू   
 
नांदेड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 277 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 283 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 106 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 177 बाधित आले.
 
आजच्या एकुण 1 हजार 156 अहवालापैकी  822 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 12  हजार 984 एवढी झाली असून यातील 8  हजार 757 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 817 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 34 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 
 
या अहवालात एकुण 5 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोमवार 7 सप्टेंबर रोजी पवार गल्ली लोहा येथील 53 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालात, बुधवार 9 सप्टेंबर रोजी कंधार येथील 63 वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, मंगळवार 15 सप्टेंबर रोजी भोकर येथील 64 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे , गुरुवार 17 सप्टेंबर रोजी गांधी नगर बिलोली येथील 70 वर्षाचा एका पुरुषाचा तर इस्लापुर किनवट येथील 38 वर्षाचा एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे  उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 343 झाली आहे.  
 
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये खाजगी रुग्णालय 24, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 19, लोहा कोविड केंअर सेंटर 10, माहूर कोविड केंअर सेंटर 5, नायगाव कोविड केंअर सेंटर 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड 17,  देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 2, बिलोली कोविड केंअर सेंटर 7 , एनआरआय / पंजाब भवन / महसूल भवन / होमआयसोलेशन 167, मुखेड कोविड केंअर सेंटर 25 असे 277 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 74, लोहा तालुक्यात 5, हदगाव तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, बिलोली तालुक्यात 2, हिंगोली 6, नांदेड ग्रामीण 7, भोकर तालुक्यात 2, नायगाव तालुक्यात 4, हिमायतनगर तालुक्यात 2, किनवट तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 1, असे एकुण 106 बाधित आढळले. 
 
तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 85,  हदगाव तालुक्यात 9, अर्धापूर तालुक्यात 9, किनवट तालुक्यात 11, बिलोली तालुक्यात 13, मुखेड तालुक्यात 15, धर्माबाद तालुक्यात 9, हिंगोली 1, नांदेड ग्रामीण 5, मुदखेड तालुक्यात 4, लोहा तालुक्यात 8, कंधार तालुक्यात 3, भोकर तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 3, यवतमाळ 1 एकुण 177 बाधित आढळले
 
जिल्ह्यात 3 हजार 817 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 281, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन, होम आयशोलेशन एकत्रित  1 हजार 762 जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 84, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवीन इमारत) 40, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 134, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 77, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 176,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 69, लोहा कोविड केअर सेंटर येथे 78, हदगाव कोविड केअर सेंटर 53, भोकर कोविड केअर सेंटर 42, कंधार कोविड केअर सेंटर येथे 46, बारड कोविड केअर सेंटर 23, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 46, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 39, मुदखेड कोविड केअर सेटर 79,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 22, किनवट कोविड केअर सेंटर येथे 205, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 53, उमरी कोविड केअर सेंटर 76, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 18,  खाजगी रुग्णालयात 329 बाधित, जिल्हा मध्यवर्ती कारागृह नांदेड 82, औरंगाबाद 1 व निजामाबाद 1, हैद्राबाद येथे 1 संदर्भित  झाले आहेत.  
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 69 हजार 898,
निगेटिव्ह स्वॅब- 53 हजार 589,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 283,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 12 हजार 984,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-32
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 10,
एकूण मृत्यू संख्या- 343,
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 8 हजार 757,
आज रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 817,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 1 हजार 320, 
आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 34,
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 70 टक्के 
 
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   


हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

हिंदी दिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न



सोनपेठ (दर्शन) :-
 
सोनपेठ येथील कै. रमेश वरपुड़कर  महाविद्यालयामध्ये हिंदी भाषा विभागाच्या वतीने हिंदी दिवसाच्या निमित्ताने विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, विभाग प्रमुख प्रा. डॉ. वनिता कुलकर्णी,  प्रा. डॉ.शिवाजी वडचकर आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील उपस्थित होते.
शहरातील कै रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने, हिंदी दिवस या भित्तीपत्रकाचे विमोचन, ऑनलाइन व्याख्यान व विद्यार्थ्यांनी प्रदर्शीत केलेली मते यांचे व्हिडीओ मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शीत करण्यात आले. हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.कुलकर्णी तसेच प्रा.डॉ. वडचकर यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी केला या कार्यक्रमासाठी मा. रामेश्वर कदम प्रा. डॉ. सुनिता टेंगसे ,प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये , प्रा.डॉ. शिवाजी अंभुरे , प्रा. डॉ. बी.एम.काळे, प्रा.महालिंग मेहेत्रे, प्रा.डॉ. गोविंद वाकणकर, श्री तुकाराम तळेकर , श्री संतुक परळकर यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन गजानन खरात तर आभार प्रा.डॉ. शिवाजी वडचकर यांनी मानले.

आपल्या परीवारातील लहान थोरांच्या वाढदिवसाच्या तसेच आपल्या व्यापाराच्या जाहीरातीसाठी व बातम्यासाठी सा.सोनपेठ दर्शन संपादक किरण रमेश स्वामी संपर्क मो.9823547752  



नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.....

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.....



परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणामधून पाण्याची आवक सुरु असून जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. परिसरातील लघु व मध्यम प्रकल्प, तलाव हे शंभर टक्के भरले असल्यामुळे धरणातील मोठ्या प्रमाणातील पाण्याची आवक पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीकाठच्या परिसरातील लोकांनी सतर्क रहावे आणि नदीपात्रात जाऊ नये, वाहने व पशुधन नदीपात्रात सोडू नये तसेच कोणत्याही प्रकारची जिवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

Thursday, September 17, 2020

परभणी जिल्ह्यात लोकडाऊन लावण्यात येणार नाही - पालकमंत्री नवाब मलिक कोरोनासंदर्भात गाईडलाईनचे कठोरपणे पालन करावे

परभणी जिल्ह्यात लोकडाऊन लावण्यात येणार नाही - पालकमंत्री नवाब मलिक
कोरोनासंदर्भात गाईडलाईनचे कठोरपणे पालन करावे


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

गेल्या काही दिवसापासून परभणी जिल्ह्यात लोकडाऊन,  संचारबंदी ,जनता कर्फ्यू लागणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फीरत आहेत त्यामुळे जनतेत विविध चर्चाना उधाण आले आहे. नेमके काय होणार याबात व्यापारी जनतेमध्ये चर्चा आहे .

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना परभणी जिल्ह्यात येणाऱ्या काळात संचारबंदी लोकडाऊन लावण्यात येणार आहे काय असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना मलिक म्हणाले परभणी जिल्ह्यात लोकडाऊन लावण्यात येणार नाही पण जनतेने सोशल डिस्टंसिंग , तोंडाला मास्क,व कोरोनासंदर्भात देण्यात आलेल्या गाईडलाईन चे कठोरपणे पालन करावे ज्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येइल पालकमंत्री नवाब मलिक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते .
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा तपशील व प्रशाषनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कामाची माहीत दिली . तसेच जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबादारी या मोहिमेबाबत माहिती दिली कोरोना संदर्भात जनतेमध्ये जनजागृती होण्यासाठी लोककलावंताच्या मार्फत पारंपरिक कलेच्या माध्यमातून जनजागृती मोहीम मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले . पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री म्हणाले जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी ५० बेड चे जंबो रुग्णालय उभारण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यात ऑक्सीजन ची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Tuesday, September 15, 2020

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम

पालकमंत्री नवाब मलिक यांचा परभणी जिल्हा दौरा कार्यक्रम


परभणी / सोनपेठ (दर्शन) :- 

राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि.16 सप्टेंबर 2020 रोजी अहमदनगर येथून परभणी येथे रात्री 10 वाजता आगमन व मुक्काम करतील.
गुरुवार दि.17 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 8.45 ते 9.10 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.15 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्मा स्तंभ क्रांतीचौक येथे अभिवादन तसेच प्रथम सत्यागृही व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. ॲङ आर.बी.देशपांडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील. सकाळी 9.30 ते 10.30 राखीव. सकाळी 10.30 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक व इतर शासकीय यंत्रणेसमवेत कोव्हिड-19 बाबत जिल्ह्याचा आढावा. तसेच जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांसमवेत जिल्ह्यातील कामांचा आढावा बैठक (जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी). दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद (जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी), दुपारी 12.30 वाजता परभणी येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण करतील.

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद ; मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो - अमित देशमुख

डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद ; मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो - अमित देशमुख 



अहमदपुर / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-                                                          
धर्म आणि राष्ट्राभिमान जागृत ठेवणारे राष्ट्रसंत आध्यात्मिक गुरु डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. आज मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी अहमदपूर येथील भक्ती स्थळ येथे जाऊन राष्ट्रसंत आध्यात्मिक गुरु डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
   वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळवूनही डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी धर्माचरण व ज्वलंत राष्ट्रवादाला वाहून घेतले.आयुष्यभर त्यांनी सामाजिक चळवळ व प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.अमित विलासराव देशमुख
(वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर) यांनी दि.15 सप्टेंबर रोजी त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
   यावेळी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, राजेश्वर निटूरे, अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.गणेश कदम, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, उपविभागीय अधिकारी महसूल प्रभोदय मुळे, तहसीलदार महेश सावंत, सभापती शिवानंद हिंगणे, कल्याण पाटील, श्याम महाजन, चंद्रकांत मद्दे आदी उपस्थित होते.