सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरातील विटा रोड स्थीत व्हीजन पब्लिक स्कूल येथे दिनांक 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंती मोठ्या थाटामाटात व उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम ढोल ताशाच्या गजरात अश्वावर बसून राजमाता जिजाऊ च्या भूमिकेत विद्यार्थिनीचे स्टेजवर आगमन झाले नंतर शाळेचे प्राचार्य पांडुरंग डुकले अध्यक्षस्थानी तर संस्थेचे सचिव विनोद पवार व उपप्राचार्य भगवान घाटुळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम राजमाता जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर मशाल पेटून कार्यक्रमाची सुरुवात झाली, विद्यार्थिनींनी एक नाटिका व एक नृत्य सादरीकरण केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले अध्यक्षीय समारोपात दुकळे सर यांनी कार्यक्रम खूप सुंदर झाल्याचा आनंद व्यक्त केला व सर्वांचे कौतुक केले शेवटी प्रल्हाद निर्मळ यांनी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सुरेखा बागवाले व वेदांती मेहत्रे यांच्याकडे सोपवण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागवाले मॅडम यांनी अतिशय सुंदर चारोळ्या युक्त असे केले या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक वृंद व शिक्षिका उपस्थित होते.
No comments:
Post a Comment