सोनपेठ (दर्शन) :-
शालेय विद्यार्थी हा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातूनच भविष्यात चित्रपट अभिनेता निर्माण होऊ शकतो असे प्रतिपादन श्री बळीराजा शिक्षण संस्थेच्या सहसचिव श्रीमती चित्राताई काशिनाथराव गोळेगावकर यांनी तालुक्यातील मौजे लासिना येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात दि. 24 जानेवारी वार शुक्रवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती चित्राताई काशिनाथराव गोळेगावकर ह्या होत्या. तर उद्घाटक म्हणून राकाँचे युवा नेते तथा नगरसेवक अॕड.श्रीकांत विटेकर हे होते .तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ सुमित्राताई श्यामसुंदर परांडे ,पत्रकार गणेश पाटील, पंडितराव कदम ,ओम परांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या शाळेत गतवर्षी एस.एस.सी .परीक्षेत प्रथम, द्वितीय ,तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना गोळेगावकर म्हणाल्या की, श्री बळीराजा शिक्षण संस्थेच्या विविध शाळा ह्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे या उद्दात हेतूने शैक्षणिक चळवळ निर्माण केली आहे. ग्रामीण भागांमध्ये अतिशय हुशार गुणवंत विद्यार्थी आहेत. या शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध कलागुण यातून भविष्यातील चित्रपट अभिनेता निर्माण होऊ शकतो .त्यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष राहिले पाहिजे असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी मराठी ,हिंदी ,लावणी, लोकगीते,व गवळणी आदी विविध गाण्यावर नृत्य केलं. याला रसिकांनी चांगलीच दाद दिली होती .कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक अंकुश परांडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान पैठणे यांनी तर आभार प्रकाश सोळंकी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद मोरे, दत्ता परतवाड, गणेश भंडे , बळीराम कदम ,रामचंद्र काकडे ,देवानंद निरस, अनिल कुंडगीर, मुंजाजी डूकरे ,सुभाष मकने आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली आहे.
No comments:
Post a Comment