Tuesday, January 14, 2020

पतंजली योग समितीचे डिघोळ व सोनपेठ येथे निशुल्क भव्य योग प्राणायाम शिबीरात सहभाग नोंदवून आरोग्य संपन्न व्हा !

पतंजली योग समितीचे डिघोळ व सोनपेठ येथे निशुल्क भव्य योग प्राणायाम शिबीरात सहभाग नोंदवून आरोग्य संपन्न व्हा ! 
सोनपेठ (दर्शन) :- 

पतंजली योग समिती, सोनपेठची प्रमुखांची बैठक संपन्न झाली.दिनांक १४ जानेवारी २०२० मंगळवार रोजी सोनपेठ येथील पतंजली योग समितीची विटा रोड सोनपेठ येथील न्यु योगेश एजन्सी येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत दिनांक २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० या कालावधीत पतंजली योग समिती सोनपेठ, कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय सोनपेठ चा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामपंचायत डिघोळ यांच्या संयुक्त विद्यमाने डिघोळ येथे पाच दिवशीय मोफत योग प्राणायाम शिबीर आयोजित करण्याचे ठरले. तसेच पतंजली योग समिती सोनपेठ व जय भवानी मित्रमंडळ, सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव २०२० निमित्ताने दि. १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत मोफत पाच दिवशीय योग प्राणायाम शिबीर आयोजित करण्याचे ठरले. या प्रसंगी पतंजली योग समिती सोनपेठ चे सर्वश्री नागनाथ सातभाई, मोहन चौलवार, उमेशअप्पा नित्रुडकर, बळीराम काटे, किरण स्वामी, प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये, नागनाथ कोटूळे, गजानन चिकने, योगेश नित्रुडकर, राधाकिशन हिक्के, अशोक मस्के, भक्तराज गांगर्डे, बाबा कदम, सुरेश पाथरकर, सौ.संध्याताई कदम, श्रीमती वंदनाताई लोहगावकर, डॉ.अर्चनाताई पारसेवार, सौ.संगीताताई साबणे, कु.मयुरी देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी दोन्ही योग शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन पतंजली योग समिती,सोनपेठ 
यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment