Tuesday, January 28, 2020

सोनपेठ येथील प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांनी जिंतुर येथे ज्ञानेश्वर विद्यालयात केला कृतज्ञता सोहळा साजरा

सोनपेठ येथील प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांनी जिंतुर येथे ज्ञानेश्वर विद्यालयात केला कृतज्ञता सोहळा साजरा

जिंतुर / सोनपेठ (दर्शन) :- 

सोनपेठ येथील कै.र.व.वरिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात कार्यरत असलेले प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांनी त्यांच्या ८ वी ते १० वी शिक्षण घेतलेल्या ज्ञानेश्वर विद्यालय, जिंतूर येथे वैश्विक मूल्य संवर्धन कार्यक्रम अंतर्गत गुणवंत विद्यार्थी सत्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार व आपल्या व शिक्षकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात डॉ.जायभाये यांनी शाळेची गुणवंत विद्यर्थिनी कु.सुवर्णा भीमराव खरात हिचा रोख ३०००/ रुपये, एक ड्रेस, पुस्तक, शाल व प्रमाणपत्र देऊन गौरव केला. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राचार्य एन.एम. कांदे सर यांना देऊन सन्मान केला. या प्रसंगी डॉ. जायभाये यांनी आपले गुरुजन शेप सर, बडे सर, कांदे सर, कच्छवे सर, केंद्रे सर, भंडारे सर, मोरे सर आदी शिक्षक वृंदाचा शाल, पुष्पहार व दर्शन घेऊन गौरव केला. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा.डॉ.ज्ञानोबा मुंढे, वरपूडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, मुख्याध्यापक कांदे सर, भगवान बाबा युवक संघटना जिंतूरचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मणराव बुधवंत, जेष्ठ शिक्षण अधिकारी श्री गजानन वाघमारे, पत्रकार राजाभाऊ नगरकर, शेख शकील, शहजाद पठाण, विजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये यांनी, सुत्रसंचलन वाघ सर यांनी तर आभार प्रा.मुरलीधर जायभाये यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेचे सर्व शिक्षक, उद्योजक श्री विलास जायभाये, प्रशांत घिके, विलास रोकडे, बाळू बुधवंत सर, ह भ प अनंता महाराज सांगळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी सरकारी अभियोक्ता अँड. योगेश सरवदे, स.पो.नी. सोपान सांगळे, दिलीप अंभोरे सर, विष्णू जवळे सर, ज्ञानोबा वारे सर अन्य मान्यवर व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment