Thursday, January 9, 2020

सोनपेठ येथे कै.राजाभाऊ कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा संपन्न ; उत्तेजनार्थ कै.र.व.महाविद्यालयाचा स्वप्नील ऊबाळे

सोनपेठ येथे कै.राजाभाऊ कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा संपन्न ; उत्तेजनार्थ कै.र.व.महाविद्यालयाचा स्वप्नील ऊबाळे

सोनपेठ (दर्शन) :-

 सोनपेठ येथे दिनांक ७ जानेवारी २०२० मंगळवार रोजी कै.र.व.महाविद्यालयात संस्थापक अध्यक्ष कै.राजाभाऊ कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा संपन्न झाल्या.या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष मा.परमेश्वर कदम (संस्थाध्यक्ष), उद्घाटक म्हणून सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डाॅ.शिवाजी शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डाॕ.वसंत सातपुते हे यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डाॅ.पंडित निर्मळ (इंग्रजी विभाग,संत तुकाराम महा.परभणी) व अॕड.मनिषा आंधळे (सदस्य,महिला व बालकल्याण समीती,परभणी) यांनी काम पाहिले.
   या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे कर्मचारी संतुक कुलकर्णी यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या व ग्रंथदान करण्यात आले.राज्यस्तरीय सत्यशोधक समाज विचारमाला स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणा-या कु.स्नेहल सुभाष कदम या विद्यार्थीनीचा महाविद्यालयाच्या वतीने  प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेचं स्वारातीम विद्यापीठाच्या रासेयो सल्लागार समीती सदस्यपदी वाणिज्य विभाग प्रमुख डाॅ.एम.डी.कच्छवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.या स्पर्धेचे उद्घाटक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डाॅ.शिवाजी शिंदे यांनी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व भाषण कौशल्य यातील परस्पर संबंध उदाहरणे देऊन सांगीतला.केवळ संभाषण कौशल्यामुळेचं प्रशासकिय कामात असूनही मी माणसे जोडू शकलो असे मत त्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले.यासोबतच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमीत्त बोलतांना भाषा संवर्धनाची गरज सांगून त्यांनी कुटुंबातील हरवत चाललेला संवाद ही चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन केले.शब्दांचे महत्व प्रतिपादन करून शब्दामुळेचं माणसे जोडली वा तोडली जातात असेही ते म्हणाले.यासोबतचं महाविद्यालयाच्या सकारात्मक उपक्रमास बक्षीसाची रक्कम प्रायोजित करून पाठिंबा देणा-या डाॅ.एम.डी.कच्छवे, डाॅ.वनिता कुलकर्णी व प्रा.अंगद फाजगे यांचा यावेळी सत्कार केला गेला.स्पर्धक विद्यार्थ्यांनी समारोप सत्रात 'अशा स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला चालना मिळते.त्याचे भाषण कौशल्य वाढीस लागते' असे मत मांडले.या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विवीध महाविद्यालयातील पंधरा स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.सर्व स्पर्धकांनी आपली अभ्यासपूर्ण भाषणे केली.या स्पर्धेतून प्रथम क्रमांक यशवंत महाविद्यालय नांदेड चा विद्यार्थी महादवाड साईनाथ नामदेव, दुसरा क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या यादव नारायण विष्णू यांनी मिळवला. तर उत्तेजनार्थ तीन पारितोषिके मातोश्री केशरबाई काळे अध्यापक महाविद्यालयाचा विद्यार्थी निकम शुभम मधुकर, बलभीम महाविद्यालय बीड चा जाधव ओमहरी कल्याण व कै.र.व.महाविद्यालयाचा ऊबाळे स्वप्नील परमेश्वर यांनी मिळवला.या बक्षीसांची औपचारिक घोषणा प्रशांत शिंगाडे याने केली.समारोप सत्रात या सर्व विजेत्या स्पर्धकांना हशिप्रमं च्या उपाध्यक्षा सौ. ज्योतीताई कदम, प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते, वक्तृत्व स्पर्धेच्या संयोजन समीतीचे प्रा.सखाराम कदम यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र,रोख रक्कम व स्मृतीचिन्हे प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ.मुक्ता सोमवंशी यांनी केले. प्रास्ताविक व स्पर्धकांना शुभेच्छा संदेश प्राचार्य डाॕ.वसंत सातपुते यांनी दिला तर आभार समन्वयक डाॅ.मुकुंदराज पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment