जम्मू- काश्मीर मध्ये चकमकीत महाराष्ट्राचे कराड मधील जवान संदिप रघुनाथ सवंत शहीद
भावपुर्ण श्रदांजली
कराड / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जम्मू- काश्मीर येथील चकमकीत मुंढे (ता. कराड) येथील जवान शहीद झाले आहेत. संदीप रघुनाथ सावंत (वय २९) असे शहीद जवानांचे नाव असून ९ वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.
११ ऑक्टोंबर १९९० रोजी जन्मलेले संदीप सावंत हे २८ सप्टेंबर २०११ रोजी सैन्यात भरती झाले होते. १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून १८ मराठा बटालियनमध्ये समाविष्ट असलेल्या संदीप सावंत यांनी भरतीनंतर राजस्थान आणि जम्मू काश्मीर येथे सेवा बजावली होती. सुमारे दीड वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगी आहे. तसेच आई - वडील, चुलते, चुलत भाऊ, बहिण असा त्यांचा परिवार आहे.
सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत फाटक यांच्याशी संपर्क साधला असता संदीप सावंत हे शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र असे असले तरी ते पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने भारतीय जवान प्रत्युत्तर देत होते. लपलेल्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याकडून शोध सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र गुरूवारी शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव पुण्यात आणले जाणार असून तेथून ते कराडला आणले जाणार असल्याचे चंद्रकांत फाटक यांनी सांगितले.
जम्मूमधील नौशेरा सेक्टरनजीक शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर संदीप सावंत हे आपल्या सहकार्यांसह शत्रूला चोख प्रत्युत्तर देत होते. त्यावेळी दुर्दैवाने संदीप यांना गोळी लागली व ते शहीद झाल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली आहे.
No comments:
Post a Comment