शेतीला पुरक जोडधंदा म्हणुन पशुपालन करा -
पशूधन अधिकारी डाॅ.पांडे एच.बी.
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील मौजे डिघोळ येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीरामध्ये आज पशूरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावकरी मंडळीचा चांगला प्रतिसाद मिळाला. गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी आदी पाळीव प्राण्यांचे रोगनिदान करण्यात आले. यामध्ये घटसर्प, खरूज, खूरकुत, कृत्रिम बीजरोपण, जंत, गर्भपेशी तपासणी, गोचिड निर्मूलन या आजारावर उपचार करण्यात आले. यात दिडशेपेक्षा अधिक प्राण्यांवर उपचार करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डाॅ. पांडे म्हणाले, युवकांनी शेतीला पुरक जोडधंदा म्हणुन पशुपालन करावे. शेळीपालन, कुकुटपालन, दुग्धजन्य पदार्थ व्यवसाय करून आपला आर्थिक विकास करता येतो. नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करून इतर अनेक रोजगाराच्या संधी देता येतील. याप्रसंगी डाॅ. गायकवाड, डाॅ. चौधरी, डाॅ. पांडूळे आदी कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे सरपंच गोकुळदास आरबाड हे होते तर प्रमुख उपस्थितीत भाजपा तालुकाध्यक्ष महादेव गिरे पाटील, डाॅ. मारोती कच्छवे, डाॅ. बापुराव आंधळे, डाॅ. मुक्ता सोमवंशी,प्रा. गोविंद वाकणकर हे उपस्थित होते.
याप्रसंगी हुतात्मा दिनानिमिताने महात्मा गांधी यांना आदरांजली आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल उबाळे या विद्यार्थाने केले तर आभार प्रदर्शन दिपक जोगडे यांनी केले.
No comments:
Post a Comment