घराच्या उन्नतीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा-निर्मलाताई विटेकर ; सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम संपन्न
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे दिनांक २१ जानेवारी २०२० मंगळवार रोजी हळदी कुंकू व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी श्रीमती निर्मलाताई विटेकर यांची परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच एएलएफ च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.संगीता खेडकर यांचा महिला मंडळाच्या वतीने शॉल, श्रीफळ, प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात सौ.रेखाबाई दहिवाळ व सौ.ताराबाई आंबेकर यांना समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलतांना निर्मलाताई विटेकर यांनी प्रत्येक घराच्या विकास व उन्नतीसाठी पुरूषा सोबतच कुटुंबातील महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरतो असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमास सरस्वतीबाई खेडकर, राधाबाई दहिवाळ, गवळणबाई टाक, आशा कुलथे, साधना आंबेकर, सविता दहिवाळ, लक्ष्मीबाई दहिवाळ, मंगल टाक, करूणा दहिवाळ, छाया टाक, वैशाली लोलगे, कल्पणा खेडकर, रेखा दहिवाळ, सरोज सावळे, आदींसह सुवर्णकार महिला मंडळाच्या सर्व सदस्या, शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वर्षा दहिवाळ यांनी केले तर सीमा वेदपाठक यांनी आभार प्रदर्शन केले.
No comments:
Post a Comment